-
राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.
-
सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ते सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे खासदार आणि नेते उपस्थित होते.
-
मालवण येथून तीन दिवसीय कोकण दौऱ्यास आदित्य यांनी सोमवारी सुरुवात केली.
-
मोठ्या उत्साहामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं.
-
आदित्य ठाकरे यांनी मालवण जेट्टी बंधाऱ्याची पाहणी केली
-
मालवण जेट्टी प्रकल्पाची सविस्तर माहिती आदित्य यांनी घेतली. तसेच मत्स्यालय प्रकल्पाच्या सादरीकरण कार्यक्रमासही ते उपस्थित होते.
-
हा प्रकल्प नेमका कसा आहे, त्याचा काय फायदा होणार यासंदर्भात त्यांनी स्थानिक नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
-
आदित्य यांनी कुणकेश्वर येथे छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शनही घेतले.
-
आदित्य यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर येथे मोठा सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांनी, आमदारांनी आणि नेत्यांनीही कुणकेश्वराचं दर्शन घेतलं.
-
या परिसरात केलेल्या विकासकामांचे आदित्य यांनी लोकार्पण केले.
-
पर्यटक व शिवभक्तांना येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे व येथील प्रादेशिक पर्यटनाला चालना मिळाल्याचे समाधान आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
-
वेंगुर्ला शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाच्या विकासकामांचे भूमिपूजनही आदित्य यांनी यावेळी केलं.
-
पाणबुडी प्रकल्प व जलपर्यटन विकासासाठी प्रस्तावित जेट्टी, ऑब्झर्वेशन डेक आणि फळ संशोधन केंद्रांतर्गत कृषी पर्यटन केंद्राची पाहणी आदित्य यांनी केली.
-
देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आदित्य यांनी सोमवारी केलं.
-
शिमगोत्सव स्पर्धेलाही आदित्य यांनी हजेरी लावली.
-
आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी त्यांचे फोटो काढण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली.
-
कुडाळमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
-
यावेळी आदित्य यांनाही लेझीम हाती घेण्याचा मोह आवरला नाही.
-
वेंगुर्ला येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.
-
या योजनेमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक तरुण उद्योजकांना नवीन उद्योगधंदे विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच योजनेंतर्गत पर्यटनविकास, मत्स्यव्यवसाय व कृषी आधारित उद्योगांवर भर देण्यात येणार आहे, असं आदित्य यांनी यावेळेस बोलताना सांगितलं.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”