-
१ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल्स डे म्हणून साजरा केला जातो.
-
या दिवशी मित्र आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांची थट्टामस्करी करत त्यांना मूर्ख बनवतात.
-
केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात ‘एप्रिल फूल्स डे’ साजरा केला जातो.
-
कोणी मूर्ख बनलं तर ‘एप्रिल फूल, डब्बा गुल…’ अशा मजेशीर ओळी आपल्याकडे म्हटल्या जातात.
-
पण जगभरातील विविध ठिकाणी मजेशीर पद्धतीने लोकांना मूर्ख बनवून ‘एप्रिल फूल्स डे’ साजरा केला जातो.
-
फ्रान्स : फ्रान्समध्ये शाळेतील मुले कागदाचा मासा बनवून मित्राच्या पाठीवर चिकटवतात.
-
ज्या मुलाच्या पाठीवर मासा दिसेल त्याला ‘एप्रिल फिश’ असं म्हणून चिडवलं जातं.
-
ग्रीस : या देशात ‘एप्रिल फूल्स डे’ दिवसाबद्दल श्रद्धा आहे.
-
यादिवशी जर तुम्ही कोणाला मूर्ख बनवण्यात यशस्वी झालात तर हे संपूर्ण वर्ष तुम्हाला आनंदी जातं, असा येथील लोकांचा समज आहे.
-
ब्राझील : ‘एप्रिल फूल्स डे’ ब्राझीलमध्ये ‘खोटं बोलण्याचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १ एप्रिलला येथील लोक इतरांना नुकसान पोहचणार नाही याची दक्षता घेत खोटं बोलतात.
-
१९२८ सालापासून हा दिवस ब्राझीलमध्ये साजरा केला जातो. ब्राझीलचे सम्राट आणि संस्थापक डॉन पेड्रो यांचा मृत्यू झाल्याची घोषणा ‘ए मेंटिरा’ या पत्राद्वारे करण्यात आली होती.
-
परंतु, ही माहिती खोटी असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी राग, द्वेष न करता ही गोष्ट मजेशीर पद्धतीने घेतली.
-
तेव्हापासून ब्राझीलमध्ये १ एप्रिल हा दिवस ‘मूर्ख दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
-
आर्यलँड : आर्यलँड देशात ‘एप्रिल फूल्स डे’ साजरा केला जातो. इथेही लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मूर्ख बनवलं जातं.
-
परंतु इथे फक्त दुपारपर्यंतच हा दिवस साजरा केला जातो.
-
स्कॉटलँड : या देशात एप्रिल महिन्याचे पहिले दोन दिवस ‘एप्रिल फूल्स डे’ म्हणून साजरे केले जातात.
-
२ एप्रिलला ‘टैली डे’ साजरा केला जातो. यादिवशी पाठीला शेपूट लावून लोकांना मूर्ख बनवलं जातं.
-
स्वीडन : लोकांना मूर्ख बनवून स्वीडनमध्ये ‘एप्रिल फूल्स डे’ साजरा केला जातो. जर कोणी मूर्ख बनलं तर ‘एप्रिल फूल, तुम्ही मूर्ख बनला आहात’, असं म्हटलं जातं. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

09 April Horoscope: अचानक लाभ अन् मौल्यवान वस्तूंची खरेदी, कोणत्या राशीच्या नशिबात कसे येईल सुख? वाचा बुधवारचे राशिभविष्य