-
जगातील सर्वांत लहान कार चालवणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, कारचा आकार पाहून लोक त्याची चेष्टा करतात.
-
मात्र या कारसाठी होणार पेट्रोलचा खर्च इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे.
-
या अनोख्या कारचे नाव Peel P50 आहे जी फक्त १३४ सेमी लांब, ९८ सेमी रुंद आहे, तर तिची उंची फक्त १०० सेमी आहे.
-
त्याच्या मालकाचे नाव अॅलेक्स ऑर्चिन आहे. ससेक्स, यूकेमध्ये तो दररोज ही कार वापरतो.
-
अॅलेक्सची उंची सुमारे ६ फूट आहे, त्यामुळे त्याला एवढ्या लहान कारमध्ये बसताना किंवा कारमधून खाली उतरताना पाहून लोक थक्क होतात.
-
बहुतेक लोक त्याच्या छोट्या कारची खिल्ली उडवतात, परंतु अॅलेक्स त्याच्या कारच्या मायलेजमुळे खूप खूश आहे.
-
ही कार ४.५ हॉर्सपॉवर इंजिनने सुसज्ज आहे आणि ती एक लिटर पेट्रोलमध्ये ४२ किमी चालवली जाऊ शकते.
-
पील इंजिनिअरिंग नावाची कंपनी ही कार बनवते. प्रथम ही कार १९६२ ते १९६५ दरम्यान बनवण्यात आली होती, नंतर २०१० पासून तिचे उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले.
-
२०१०मध्ये या कारला जगातील सर्वात लहान कार म्हणून घोषित करण्यात आले असून या कारचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
-
ही कार आकाराने इतकी छोटी असली तरी तिची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करेल.
-
अॅलेक्सने सांगितले की नवीन पी५० ची किंमत ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, म्हणूनच त्याने सेकंड हँड पी५० खरेदी केली.
-
या कारचा कमाल वेग ३७ किमी प्रतितास आहे आणि या गतीने अॅलेक्सने गेल्या वर्षीच या कारने संपूर्ण ब्रिटनचा प्रवास केला आहे.
-
(सर्व फोटो : ट्विटर)

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा