-
आज १४ एप्रिल २०२२ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पिढ्यानपिढ्या जातीपातीच्या जोखडात अडकलेल्या, सगळ्याच पातळ्यांवर मागास राहिलेल्या पददलित समाजाला त्याच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून देत, संघर्ष करण्यासाठी उभं राहण्याची प्रेरणा देण्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य अजोड आहे.
-
डॉ. बाबासाहेबांनी अनमोल अशी साहित्य निर्मिती केली आहे, जी आजच्या काळातही सुसंगत आहे. डॉ. बाबासाहेबांच्या कारकिर्दितील अनेक विधानं समाज परिवर्तनास कारणीभूत ठरली. त्यातीलच काही महत्त्वपूर्ण विधानांवर आपण प्रकाश टाकणार आहोत.
-
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
आपण सर्वप्रथमही भारतीय आहोत आणि अंतिमत:ही भारतीय आहोत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
आयुष्य मोठं नाही तर महान असावं. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सर्व फोटो : Indian Express Archive)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स