-
एकेकाळी ‘जेसीबी की खुदाई’ मुळे ट्रेंडमध्ये आलेला बुलडोझर सध्या पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.
-
सर्वसामान्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बुलडोझरने राजकारण्यांनाही भूरळ घातली आहे.
-
उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील हातात खेळण्यातील बुलडोझर घेऊन दिसले. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
भारत दौऱ्यावर असलेल्या ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील गुजरात मधील जेसीबी मशीन कंपनीला भेट दिली.
-
यादरम्यानचा त्यांचा बुलडोझरवरील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
पण सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जेसीबीचं नाव आणि किंमत तुम्हाला माहितीये का?
-
बुलडोझरला सर्वसामान्य भाषेत जेसीबी असं म्हटलं जातं.
-
परंतु जेसीबी हे बुलडोझरचं नाव नसून मशीन बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे.
-
जेसीबी कंपनीचं पूर्ण नाव जोसेफ सिरिल बामफोर्ड (Joseph Cyril Bamford) असं आहे.
-
तर या मशीनचं खरं नाव बैकहो लोडर (backhoe loader) असं आहे.
-
पहिलं जेसीबी मशीन पांढऱ्या आणि लाल रंगाची होती. पण नंतर त्याचा रंग बदलून पिवळा करण्यात आला.
-
याचं मुख्य कारण म्हणजे पिवळा रंग मातीशी संबंधित आहे आणि हा रंग गर्दीतही दुरून उठून दिसतो.
-
त्यामुळे दिवस असो वा रात्र, बुलडोझरच्या पिवळ्या रंगामुळे येथे उत्खननाचे काम सुरू असल्याचे दुरूनच कळते.
-
बुलडोझर मशीनचे अनेक प्रकार आहेत. यापैकी ‘लोडर’ आणि ‘बकेट मॉडेल’ हे दोन प्रकार आहेत.
-
बुलडोझर बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘जेसीबी’ कंपनीचे ‘जेसीबी थ्रीडी एक्स’, ‘जेसीबी थ्रीडी एक्स सुपर’, ‘जेसीबी थ्रीडी एक्स्ट्रा’, ‘जेसीबी ४३० झेड एक्स’, ‘जेसीबी ४३२झेड एक्स’ असे वेगवेगळे मॉडेल उपलब्ध आहेत.
-
या जेसीबी मशीनची किंमत अतिशय किफायतशीर आणि लोकांच्या बजेटमध्येही असते.
-
भारतात जेसीबी मशीनची किंमत ८ लाख ते ५० लाख रुपये आहे.
-
(सर्व फोटो : Pexels)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल