-
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करणाऱ्या ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतेच मुंबईमध्ये झाले.
-
मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झालं.
-
यावेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी शाह यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल भाष्य केलं.
-
विशेष म्हणजे या वेळी फडणवीस यांनी अमित शाह यांना मराठ्यांबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादणारा आदर, प्रेम आणि त्यासंदर्भातील अभ्यासाबद्दलही माहिती दिली. ते नेमकं काय म्हणालेत हे या गॅलरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
-
फडणवीस यांनी अमित शाहांना मराठे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल विशेष प्रेम असल्याचं सांगितलं.
-
केवळ प्रेमच नाही तर या मराठ्यांच्या आणि छत्पपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा चांगला अभ्यास अमित शाहा यांनी केल्याचंही यावेळी आपल्या भाषणात फडणवीस यांनी म्हटलंय.
-
अनेकदा अमित शाहांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाल्यास ते अनेक तास बोलत राहतात असं फडणवीस म्हणाले.
-
“नऊ साडेनऊ वाजता अमितभाईंकडे गेलं अन् गप्पागप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सलग तीन साडेतीन तास अमितभाई मराठ्यांच्या इतिहासावर बोलतात,” असं फडणवीस यांनी कार्यक्रमातील भाषणादरम्यान सांगितलं.
-
“आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते वसईच्या संधीपर्यंतचा मराठ्यांचा जो सगळा इतिहास आहे याचा पूर्ण अभ्यास अमित शाहांनी केलाय,” असं फडणवीस म्हणाले.
-
“छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासावर अभ्यास करुन अमित शाहांनी गुजराती भाषेत एक पुस्तक लिहिलं आहे. अजून हे पुस्तक प्रकाशित व्हायचं आहे,” असंही फडणवीस यांनी सांगितलं.
-
विशेष म्हणजे गुजराती भाषेतील हे पुस्तक लिहिण्यासाठी अमित शाहांनी अगदी लंडनवरुनही काही साहित्य आणि कागदपत्रं पुरावे म्हणून आणल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
-
छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे पुस्तक लिहिण्यासाठी अमित शाहांनी लंडनपर्यंत जाऊन तिथल्या अर्काइव्हजमधून सरकारकडून सगळी विश्वासार्ह कागदपत्रं घेऊन आल्याचा दावाही फडणवीस यांनी केलाय.
-
“त्या कागदांच्या आधारावर महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास अमित शाहांनी अभ्यासित केला आणि आज तो सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असंही फडणवीस म्हणाले.
-
“मराठ्यांच्या इतिसाहाबद्दल अगदी भरभरुन बोलताना अमितभाई आपल्याला पहायला मिळतात, त्यावेळी असं वाटतं की एखादे शिवकथाकार हे इतिहास सांगतायत एवढी अमितभाईंची सांगण्याची हतोटी आहे,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
-
अमित शाहांच्या या मराठ्यांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासप्रेमाचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतलाय, असंही फडणवीस म्हणाले.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिसाहाबरोबरच अमित शाह यांना संगीत क्षेत्राबद्दलही विशेष आवड आहे असं सांगताना फडणवीस यांनी लता मंगेशकर यांच्या घरी झालेल्या भेटीदरम्यान अमित शाह आणि लतादिदींनी बराच वेळ गाण्यांवर गप्पा मारल्याचं म्हटलं.
-
अमित शाह हे इतिहासाचे उत्तम जाणकार असून अनेकदा ते ऐतिासिक संदर्भ देताना दिसतात असं फडणवीस यांनी अधोरिखेत करण्याचा प्रयत्न केला. (सर्व फोटो फेसबुक आणि ट्विटरवरुन साभार)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ