-
सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, एकदा अशी आक्रमक भाषा वापरत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली.
-
औरंगाबादमधील सभेत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
-
मात्र शरद पवारांवरील या टीकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्तर दिलं.
-
अजित पवार काय म्हणाले, त्यांनी असं काय म्हटलं की जवळजवळ प्रत्येक वाक्याला कार्यकर्ते हसत होते हे जाणून घेण्याआधी राज ठाकरे काय बोलले ते पाहूयात…
-
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली.
-
प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले.
-
जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली.
-
पवारांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे, अशी टीका राज यांनी केली.
-
आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व द्वेष वाढल्याच्या अरोपाचाही राज यांनी पुनरुच्चार करत केला.
-
याच टीकेला आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उत्तर दिलंय.
-
विशेष म्हणजे अजित पवार यांनी इतर नेत्यांची मिमिक्री करणाऱ्या राज ठाकरेंची मिमिक्री करत निशाणा साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये एकच हसू फुटल्याचं पहायला मिळालं.
-
“त्या सभेला महत्वं द्यायचं कारण नाही. पूर्वीचीच कॅसेट लावलेली आहे, पवार साहेब जातीयवादी. नाशिककरांना माहितीय की पवार साहेब जातीयवादी आहेत की नाही. राजू शेट्टींनी सांगितलेलं की पवार जातीयवादी नाहीत. रामदास आठवलेंनी सांगितलेलं ना की पवार जातीयवादी नाहीत,” असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंनी इतर नेत्यांनी खोडून काढलेला मुद्दा मांडल्याचं अधोरेखित केलं.
-
“साहेबांची ५०-६० वर्षांची कारकीर्द तुमच्यासमोर आहेच. त्यात एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण आहे?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारलाय.
-
“लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता तिकडची सुपारी घेतली,” असं अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.
-
“त्या काळात त्यांनी भाषणं काय दिली? केंद्र सरकारच्या विरोधात दिली. आता मात्र भाषणं कशी चाललीयत. काल दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वावर ते बोलले नाहीत. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तेच तेच,” असा टोला अजित पवारांनी लगावला.
-
“काय तर पवार साहेब शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेतात. अरे पवार साहेबांनी कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं घेऊ नये हेच एकेकाळी पवार साहेबांची मुलाखत घेताना काय कौतुक करायचे,” अशी आठवण अजित पवारांनी करुन दिली.
-
“अरे बापरे बापरे, किती झटपट हे लोक सरड्यासारखे रंग बदलतात त्याचं त्यांना माहिती,” असा टोला अजित पवारांनी लगावला.
-
“आम्ही तरी एखाद्याचं कौतुक केलं आणि परत टीका करायची म्हटल्यावर विचार करतो अरे कसं बोलायचं,” असंही अजित पवार म्हणाले.
-
आधी कौतुक करुन नंतर टीका करताना आमची जीभ पण वळत नाही, रेटली जात नाही. त्यांना काही देणं घेणं नाही, असंही अजित पवार म्हणाले.
-
“कधी तरी १५-२० दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी… दिवस मावळल्यावर. उन्हाबिन्हाचं नाही, सुर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर,” सभा घेतात असा टोला अजित पवारांनी लगावला.
-
त्यानंतर सहकाऱ्यांकडे नॅपकिन मागत तो राज ठाकरे भाषणादरम्यान ज्याप्रमाणे नाकावरुन फिरवतात तसा नाकारवरुन फिरवत त्यांची नक्कल केली.
-
“काय पुसततात… काय एकदाचं आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायाचा,” असा टोला अजित पवारांनी नाकावरुन नॅपकिन फिरवताना लगावला.
-
पवारांनी केलेली ही नक्कल पाहून त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही हसू अनावर झालं. पुढे बोलताना, “होतं काय की त्यांनी भाषण दिल्यानंतर आपण दोन तीन दिवस ती कॅसेट चावलतो. मग मीडिया त्याला अजित पवारांनी हे प्रतिउत्तर दिलं,” असा खोचक टोला अजित पवारांनी प्रसारमाध्यमांनाही लगावला.
-
“मग परत त्यातून काय बोलणार काय नाही असं चालू राहतं. नाशिककरांनो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो यामधून लोडशेडिंगचा प्रश्न सुटणार नाहीय,” असंही अजित पवार म्हणाले.
-
अजित पवारांनी राज ठाकरेंची नक्कल केल्याचा हा प्रसंग सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय.

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?