-
ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
-
प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे सूत्र पक्क करण्यासाठी अगदी तळागाळापर्यंतच्या पोहचवण्याचे काम करणारा नेता म्हणून आनंद दिघे ओळखले जातं होते.
-
९० च्या दशकात शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. ( Photo Credit :Yash More Facebook Page)
-
ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात शिवसेना अगदी मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम दिघे यांनी केले. ( Photo Credit : Praboddh Davkharey Facebook Page)
-
शाखा संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. ( Photo Credit : ML Patel Facebook Page)
-
त्यांचे पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे असे होते. ( Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आनंद दिघेंचा जन्म जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला. ( Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
ठाण्यातील सर्वात गजबजाटलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरामध्ये त्यांचे घर होते. ( Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
याच परिसरात असणाऱ्या सेंट्रल मैदान भागांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. ( Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
त्यांच्या या सभेला अगदी तरुणपापासून आनंद दिघे या सभांना आवर्जून उपस्थित रहायचे. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान्यांमधून पुढे आलेले आणि आपलेसे वाटणारे नेतृत्व हवे होते ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली. त्यांच्या या सभेला अगदी तरुणपापासून आनंद दिघे या सभांना आवर्जून उपस्थित रहायचे. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
त्यांनी बाळासाहेबांपासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले. ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर मजल दरमजल करत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहचले. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
अल्पावधीमध्येच आजही शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले. (Photo Credit : Arun Pathak Facebook Page)
-
आनंद दिघे यांच्या खांद्यावर पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर ते टेंभी नाक्यावरील कार्यालयातच राहू लागले. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
त्यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात पूर्णपणे झोकून दिले. अनेकदा कार्यकर्तेच त्यांना डबा आणून द्यायचे. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा. आपल्या तक्रारी दिघे यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभे असायचे. (Photo Credit : Dharmveer Anand Dighe Saheb Facebook Page)
-
ठाणे शहरच काय जिल्हाभरातील लोक येथे येऊन त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. आनंद दिघे यांनी कधीच बघू काहीतरी करु अशी उत्तरे दिली नाहीत. ( Photo Credit : Anand Dighe Saheb Fan Club)
-
अनेकदा ते तक्रार ऐकल्यानंतर तेथूनच फोन करायचे आणि तक्रार सोडवण्याच्या सूचना द्यायचे अशा आठवणी जुने शिवसैनिक आजही सांगतात. (Photo Credit : Anand Dighe Saheb Fan Club)
-
कधी कधी काम पूर्ण करुन घेण्यासाठी त्यांनी रोक’ठोक’ भूमिकाही घेतल्या आहेत. ( Photo Credit : Anand Dighe Saheb Fan Club)
-
त्यांनी काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा तयार झाला. (Photo Credit : Anand Dighe Saheb Fan Club)
-
आनंद दिघे यांनी स्थापन केलेले ‘आनंद आश्रम’ हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आनंद दिघे यांना देवा-धर्माच्या कार्याची विशेष आवड होती. त्यांनीच टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव सुरु केला. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
सर्वात पाहिला मोठा दहिहंडी उत्सवही दिघेंनीच टेंभी नाक्यावर सुरु केला. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आजही या दोन्ही उत्सवांसाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक आवर्जून येतात. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आनंद दिघे यांची सामान्यांमध्ये ‘आपला नेता’ अशी ओळख होती. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
त्यामुळेच अगदी लहानसहान भांडणांपासून ते घरातील तक्रारींपर्यंत अनेक विषय दिघेंच्या जनता दरबारामध्ये यायचे. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले अनेकांना स्टॉल उभारुन दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. (Photo Credit : Swa.Dharmveer Anand Dighe youth Foundetion,Machnur)
-
त्यांच्या याच कामांमुळे त्यांच्या मृत्यूला दीड तप उलटून गेले तरी ठाणेकर दिघेंना विसरलेले नाही. (Photo Credit : Anand Dighe Saheb Facebook Page)
-
आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळेवेळी त्यांची दखल घेतली. (Photo Credit : Dharmaveer Movie)
-
फ्रंटलाईन या मासिकात आनंद दिघेंसंदर्भातील लेखामध्ये त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन करताना ‘दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ झाले होते’, असे मत मांडण्यात आले होते.(Photo Credit : Dharmaveer Movie)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”