-
गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने इतिहास रचला आहे.
-
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका, गुरुवारी कांचनजंगा पर्वतावर चढाई केल्यानंतर ८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेली पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
-
३० वर्षीय प्रियांका मोहितेच्या नावावर एकापेक्षा एक विक्रमांची नोंद आहे.
-
प्रियंका मोहिते हिने गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर करून ही मोहीम पूर्ण केली आहे. या पर्वताची उंची ८,५८६ मीटर आहे.
-
प्रियांका मोहितेला २०२० मध्ये तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
तिने एप्रिल २०२१ मध्ये अन्नपूर्णा शिखर सर केले होते जे जगातील दहावे सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची ८,०९१ मीटर आहे.
-
८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ५ शिखरे सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.
-
प्रियंका मोहितेने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील सर केले आहे. माउंट एरेस्टची उंची ८,८४९ मीटर आहे.
-
तिने ल्होत्से पर्वतही सर केला आहे. या पर्वताची उंची ८,५१६ मीटर आहे.
-
वयाच्या ३०व्या वर्षी प्रियंका मोहितेने ८,४८५ मीटर उंचीचा मकालू पर्वत देखील सर केला आहे.
-
तिने ८,८९५ मीटर उंचीवरील किलीमांजारो पर्वतावरही चढाई केली आहे.
-
प्रियंका मोहितेला नेहमीच पर्वत चढण्याची आवड होती. त्याने किशोरवयातच पर्वत चढायला सुरुवात केली.
-
त्याच वयात तिने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांवर चढाई केली होती.
-
२०१२ मध्ये तिने हिमालयातील गढवाल विभागातील बंदरपंच पर्वतावर चढाई केली होती.
-
सर्व फोटो : Instagram/ @priyankamohite11

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ