-
इंग्लंडमध्ये अलीकडेच मंकीपॉक्स आजाराचा नवीन रुग्ण आढळला आहे. हा रोग आपल्याकडील देवी (रोग) सारखाच एक दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA)ने सांगितलं की, इंग्लंड मंकीपॉक्सचा संसर्ग झालेली व्यक्ती अलीकडेच नायजेरिया देशातून आली होती. येथेच त्याला मंकीपॉक्स संसर्गाची लागण झाल्याचं मानलं जात आहे. (फोटो- एपी)
-
मंकीपॉक्स हा साथीचा आजार असून १९७० साली पहिल्यांदा या साथीचा पहिला रुग्ण आढळला होतां. आफ्रिकेतील ११ देशात या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. (फोटो- रॉयटर्स)
-
त्यानंतर २००३ साली पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १८ वर्षांनी पुन्हा अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
२००३ साली घानावरून मागवण्यात आलेल्या पाळीव कुत्र्यामुळे अमेरिकेत हा संसर्ग पसरला होता. आतापर्यंत आशिया खंडात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
मंकीपॉक्स झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने या रोगाचं संक्रमण होतं. मंकीपॉक्सची लागण ६ ते १३ दिवसात होते. काही लोकांना ५ ते २१ दिवसातही संसर्ग होण्याची शक्यता असते.
-
मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये दुखापत होते. त्याचबरोबर थकवा जाणवतो. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
त्याचबरोबर आजारी व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही याचा प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचं प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका असतो. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
-
मंकीपॉक्सवर आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. लसीमुळे मंकीपॉक्स आटोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. यावर अजूनही संशोधन सुरू आहे. (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”