-
अकोल्यात नुकताच शाही विवाहसोहळा पार पडला.
-
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले.
-
नातवांच्या हट्टापायी गुलाबराव गावंडे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले.
-
गुलाबराव गावंडे हे माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांचे वडील.
-
११ मे रोजी गुलाबराव गावंडे आणि आशा गावंडे यांच्या लग्नाचा ४१ वा वाढदिवस होता.
-
लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाह करण्याचे ठरले होते.
-
अकोल्यातील फार्मसी महाविद्यालयात गुलाबराव गावंडे आणि आशा गावंडे यांचा लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा शाही विवाह सोहळा पार पडला.
-
या विवाहसोहळ्याला जिल्ह्यातील सर्वच राजकिय नेते, उद्योजक, अधिकारी, यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
-
या अनोख्या विवाहसोहळ्याची अकोल्यात चर्चा होती.
-
एकेकाळी पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा चेहरा म्हणून गावंडे यांची ओळख होती.
-
मनोहर जोशींच्या युती शासनाच्या काळात त्यांच्याकडे क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.
-
गुलाबराव गावंडे यांनी कारंजा, बोरगांव मंजू, अकोट या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
-
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अकोला पश्चिम मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला.
-
गुलाबराव गावंडे यांनी धनुष्यबाण सोडून हातात घड्याळ बंधले.
-
गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS