-
जगभरात ग्लोबल वार्मिंगची चर्चा सतत होत आहे. यावेळी आवर्जून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे सांगितलं जाते.
-
जगात जेव्हा जेव्हा हिरवाईला चालना देण्याची चर्चा होते तेव्हा इटलीतील मिलान शहरात उभारण्यात आलेल्या बॉस्को व्हर्टिकल (bosco verticale) या हाय-राईज कॉम्प्लेक्सची चर्चा नक्कीच होते.
-
या कॉम्प्लेक्सची चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यावरचं व्हर्टिकल फॉरेस्ट (vertical forest)
-
इटलीचं हाय-राईज कॉम्प्लेक्स बॉस्को व्हर्टिकल २०१४ मध्ये बांधले गेले. हे इटालियन आर्किटेक्ट आणि शहर नियोजक स्टेफानो बोएरी यांनी डिझाइन केले होते.
-
अशा दोन इमारती शेजारी शेजारी बांधल्या गेल्या.
-
दोन्ही कॉम्प्लेक्स मिळून ८०० हून अधिक झाडे आणि १५ हजार वनस्पती आहेत.
-
ही वास्तू हरित नागरी जीवनाचे प्रतीक मानली जाते.
-
स्टेफानो बोएरी नावाची व्यक्ती २००७ मध्ये दुबईला गेली होती. तिथे त्याला हायराईज बिल्डिंग दिसली. त्या इमारतींमध्ये काच, धातू आणि सिरॅमिकचा वापर करण्यात आला. त्यामुळे सूर्याची किरणे त्या इमारतींवर पडली की उष्णता वाढली. यावर संशोधन करण्यात आले. संशोधनात असे आढळून आले की २००० नंतर तेथे बांधलेल्या इमारतींपैकी ९४ टक्के इमारतींमध्ये काचेचा वापर करण्यात आला होता.
-
वाढलेली उष्णता रोखण्यासाठी दोन उंच इमारती बांधून त्यामध्ये रोपे लावण्याची संकल्पना इटलीमध्ये तयार करण्यात आली.
-
सूर्यकिरणांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून प्रत्येक मजल्यावर झाडे लावण्यात आली. बॉस्को व्हर्टिकलची तयारी २००९ मध्ये सुरू झाली आणि ती २०१४ मध्ये पूर्ण झाली. याची जगभर चर्चा झाली.
-
दोन्ही टॉवर्सची उंची ८० आणि ११२ मीटर आहे. इमारतीमध्ये अधिक झाडे असल्याने ओलावा टिकून राहतो. त्यांना जास्त ऑक्सिजन मिळतो आणि ते जास्त कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेतात.
-
या इमारती पक्ष्यांना आकर्षित करतात आणि मानवाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. उभ्या जंगलाची ही संकल्पना नंतर जगातील अनेक इमारतींमध्ये सुरू झाली. (फोटो: AP)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक