-
प्रशांत किशोर हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांनी भाजपा आणि काँग्रेससह विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती बनवण्याचं काम केलं आहे. एका मुलाखतीत, त्यांना अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि फ्लिफकार्ट संबंधित प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टला AAP पेक्षा चांगलं स्टार्टअप म्हटलं आहे.
-
अलीकडेच प्रशांत किशोर यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखती दिली असून अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत.
-
रॅपिड फायर राउंडमध्ये, फ्लिपकार्ट आणि आम आदमी पार्टीमध्ये तुम्हाला कोणता स्टार्टअप चांगला वाटतो, असं विचारलं असता, प्रशांत किशोर यांनी विलंब न करता फ्लिपकार्टचं नाव घेतलं आहे.
-
आम आदमी पार्टीबाबत त्यांना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. आगामी काळात भाजपाला कोणता पक्ष आव्हान देऊ शकतो, आम आदमी पार्टी की काँग्रेस? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
-
प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपाला आव्हान देण्यासाठी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत वाटतो.
-
यावेळी सर्वकालीन आवडता भारतीय नेता कोण? असा सवाल विचारला असता, त्यांनी महात्मा गांधींचं नाव घेतलं. (छायाचित्र: टीम प्रशांत किशोर फेसबूक)
-
त्याचवेळी त्यांना हयात असलेल्या नेत्यांबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितले की, लालकृष्ण अडवाणी त्यांना खूप आवडतात. विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही काम केलं आहे.
-
अडवाणींनी ज्या प्रकारे भाजपाला तयार केलं आणि आज ते ज्या स्तरावर पोहोचले आहेत, हे कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले. (सर्व फोटो सौजन्य- पीटीआय)

पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल