-
‘अनाथांची माय’ पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा रविवारी दि. १५ मे २०२२ रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे थाटात पार पडला.
-
माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातून तीन हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी हजेरी लावली.
-
मागील अनेक दिवसांपासून सिंधुताईंवर प्रेम करणारी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होते.
-
‘माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात’ अस स्वप्न सिंधुताई सपकाळ यांनी बघितलेल होत.
-
‘माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात’ असं स्वप्न सिंधुताई सपकाळ यांनी बघितलेलं होतं.
-
माईंनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी ममता बाल सदन कुंभारवळण यांनी मागील ३ महिन्यांपासून सूक्ष्म नियोजन केले होते.
-
आज माई असत्या तर त्यांच्या उपस्थितीत या विवाह सोहळ्याला आणखी आगळे-वेगळे रूप मिळाले असते. त्यांचं स्वप्न आज ममता बाल सदनने सत्यात उतरवलं आहे.
-
या सर्व मुलींची सर्व हौस संस्थेने आपल्या स्वतःच्या सख्ख्या मुलींसारखी पूर्ण केली.
-
आज संपूर्ण देशात अश्या पद्धतीने अनाथांची लग्न लावले जाणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
-
माईंवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी यांनी माईंच्या लेकींना आशीर्वाद दिले.
-
दिवसरात्र जागून अपार कष्ट घेऊन ममता बाल सदन कुंभारवळण पुणे यांनी आज खऱ्या अर्थाने सिंधुताईंच स्वप्न पूर्ण केले आहे.
-
आतापर्यंत माईंना २१० जावई, ५० सुना होत्या. आता ह्यात आणखी ९ जावयांची नव्याने भर पडली आहे.
-
लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं. जग फक्त अनुभव देतं, साथ तर फक्त आई-वडील देतात. त्या धर्तीवर सिंधुताईंनी पहिला सांभाळलेला अनाथ मुलगा दिपक गायकवाड हे संस्थेतच लहानाच्या मोठ्या झालेल्या ९ उपवर मुलींचे आई-वडील-पालक म्हणून भूमिका बजावत आहेत.
-
सध्या संस्थेत ६० मुली असून त्यांचे पालन पोषण, शिक्षण आणि संगोपन योग्य रीतीने झाले पाहिजे यासाठी ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड परिश्रम घेत आहेत.
-
दिपक गायकवाड यांना माईंची कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ यांची मोलाची साथ मिळत आहे.
-
दिपक आणि ममता यांच्यासह ममता बाल सदनमधील प्रत्येक कर्मचारी वर्ग आणि वधूंसह सर्व मुलींची मनं ओथंबली होती.
-
संस्थेत लहानाच्या मोठ्या झाल्या असल्या तरी त्या सर्व मुली ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक यांच्या काळजाचा तुकडा होत्या. त्यांच्यासाठी ह्या सर्व लेकी लाडक्या होत्या.
-
या प्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी, ‘चला हवा येऊ द्या’ प्रसिद्ध हास्य विनोदी कलाकार भारत गणेशपुरे, विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता ममता बाल सदन कुंभारवळण, सन्मती बाल निकेतन मांजरी, मनशांती छात्रालय शिरूर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, गोपिका गायरक्षण केंद्र माळेगाव ठेका वर्धा जिल्हा, गोपाल देशी गोशाला कुंभारवळण,मनीष जैन पूजा जैन यांनी परिश्रम घेतले. (सर्व फोटो सौजन्य : फेसबुक)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’