-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. राज हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीच्या कामानिमित्त दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत.
-
दौ-याच्या पहिल्याच दिवशी राज हे पुस्तक खरेदीसाठी बाहेर पडले. (येथून पुढील सर्व फोटो : सागर कासार, लोकसत्ता डॉटकॉम)
-
मात्र बाजीराव रस्त्यावरील पुस्तकांच्या दुकानात जात असताना राज ठाकरे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतपल्याचं दिसून आलं.
-
प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून राज यांनी ‘काही जगू द्याल की नाही?’ असं म्हणत त्यांना कॅमेरे बंद करायला लावले आहेत. हा सर्व घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.
-
आता हा राज ठाकरेंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
-
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरील संताप व्यक्त केल्यानंतर राज थेट बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीत पोहोचले.
-
नंतर राज तिथे बराच वेळ वेगवेगळी पुस्तकं बघत होते.
-
राज यांना विविध प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनाची आवड असल्याचं सर्वश्रूत आहे. राज यांनी आपल्या संग्रहामध्ये पुस्तकांची भर टाकण्यासाठी पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीची निवड केली.
-
बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोहचले ते थेट पावणे दहाच्या आसपास तिथून बाहेर पडले.
-
बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोहचले ते थेट पावणे दहाच्या आसपास तिथून बाहेर पडले.
-
राज यांनी बराच वेळ वेगवेगळ्या विभागामधील पुस्तकं चाळली आणि विकतही घेतली.
-
राज या पुस्तकांच्या दुकानात दीड तास रमले होते.
-
राज यांनी विकत घेतलेल्या पुस्तकांमध्ये गोविंद सखाराम देसाई लिखित मराठी ‘रियासत’चे आठ खंड, मृत्युंजयची नवीन आवृत्तीसह अनेक ऐतिहासिक पुस्तकाचा समावेश आहे.
-
राज यांनी बराच वेळ उभी राहून पुस्तकं चालळ्यानंतर ते थोडा वेळ थेट बसून पुस्तकं चाळू लागले.
-
राज यांच्या या भेटीसंदर्भात अक्षरधारा बुक गॅलरीचे प्रमुख रमेश राठीवडेकर यांच्यासोबत संवाद साधला असता, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजवर आमच्या दालनास अनेक वेळा भेट दिली आहे,” असं सांगितलं.
-
“राज यांनी नेहमीच विविध प्रकारची पुस्तकं खरेदी केली आहे. मात्र आज त्यांनी दीड तास इथं पुस्तकं चाळली,” असं राठीवडेकर म्हणाले.
-
राज यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांसोबतच आत्मचरित्रं, कला क्षेत्रातील पुस्तकांची त्यांनी खरेदी केल्याचंही राठवडेकर म्हणाले.
-
जवळपास ५० हजार रुपये किंमतीची पुस्तकं राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान खरेदी केली असल्याचे राठवडेकर यांनी सांगितले.
-
राज यांनी २०० हून अधिक पुस्तकं विकत घेतली.
-
राज यांनी केलेली पुस्तक खरेदी ही ५० हजार रूपयांच्या आसपास झाली.
-
राज ठाकरेंनी जवळजवळ दीड तास विविध विषयावर यावेळी चर्चा देखील केल्या राठवडेकरचे त्यांनी सांगितले. (सर्व फोटो : सागर कासार, लोकसत्ता डॉटकॉम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स