-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. (सर्व फोटो रोहित पवार यांच्या ट्विटरवरुन साभार)
-
आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने ब्रिटन दौवऱ्यावर गेलेत.
-
या दौऱ्यामधील काही फोटो त्यांनी ट्विटवरुन शेअर केलेते. दौऱ्यादरम्यान रोहित यांनी केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली.
-
“जगातील तिसरे सर्वांत जुने विद्यापीठ अशी ओळख असलेल्या ब्रिटनमधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली,” असा कॅप्शनसहीत त्यांनी काही फोटो शेअर केलेत.
-
“केंब्रिज विद्यापीठामध्ये ‘साऊथ एशियन युथ संघटने’ने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सहभागी झालो. यावेळी विद्यापीठातील तज्ज्ञ, संशोधक, विचारवंत व विद्यार्थ्यांशी अनेक विषयांवर चर्चा झाली,” अशी माहिती रोहित यांनी ट्विटरवरुन दिलीय.
-
याच विद्यापीठात पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग या भारतीय पंतप्रधानांनी शिक्षण घेतलं, असंही रोहित पवार कॅप्शनमध्ये म्हणालेत.
-
अनेक मोठे नेते, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांनीही केंब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेतल्याचं या विद्यापिठातील फोटो शेअर करत रोहित यांनी सांगितलंय.
-
महात्मा गांधींनी १९०९ साली पहिल्यांदा आणि १९३१ मध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी दुसऱ्यांदा केंब्रिज विद्यापीठाला भेट दिली होती. या भेटीचीही आठवण यावेळी निघाल्याचं रोहित म्हणालेत.
-
ट्रिनिटी कॉलेज तसंच महात्मा गांधींनी ज्या पेमब्रोक कॉलेजमध्ये पहिल्यांदा भाषण केलं तिथंही या दौऱ्यात भेट दिली.
-
रोहित यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांसोबतचे फोटो २६ मे रोजी शेअऱ केले आहेत.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं त्या घरालाही रोहित पवार यांनी आपल्या या दौऱ्यादरम्यान भेट दिली.
-
“लंडनमध्ये पूर्वनियोजित बैठकीसोबतच आवर्जून वेळ काढत भारताशी नातं सांगणाऱ्या एका ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. ती वास्तू म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं ती वास्तू,” अशा कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी फोटो शेअर केलेत.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केलं त्या घरात महामानवाला अभिवादन करून नतमस्तक झालो, असंही रोहित पवार म्हणालेत.
-
रोहित पवार यांनी या घरामधील काही ऐतिहासिक वस्तू आणि माहितीपर तपशील वाचाताना फोटो शेअर केलेत. “ही भेट संस्मरणीय आणि खूप ऊर्जा देणारी ठरली,” असंही रोहित म्हणाले आहेत.
-
या भेटीदरम्यान रोहित यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र आमदार अतुल बेनके आणि आमदार योगेश कदम हेही उपस्थित होते.
-
लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’लाही रोहित पवार यांनी भेट दिली.
-
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याच्या साह्याने अफजलखानाचा कोथळा काढला त्या वाघनख्या लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम’मध्ये असल्याचं बोललं जातं. या म्युझियमला आवर्जून भेट दिली असता या वाघनख्या बघायला मिळाल्या, असं रोहित यांनी सांगितलं आहे.
-
ही वाघनखं पाहून महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास आठवून अंगावर अक्षरशः शहारे आले, असंही रोहित यांनी फोटो कॅप्शनमध्ये म्हटलंय.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”