-
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना मोठी पगारवाढ मिळणार आहे.
-
ही पगारवाढ एवढी मोठी आहे की पारेख हे देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक वेतनमान असणारे प्रमुख बनण्याच्या मार्गावर आहेत.
-
पारेख यांना सध्या ४२.५० कोटी रुपये वार्षिक वेतन मिळते.
-
पारेख यांना आता ८८ टक्के वेतनवाढ देण्यात आली असून सुधारित वेतन हे २ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे.
-
पारेख यांचे वार्षिक वेतन तब्बल ८८ टक्क्यांनी वाढून ७९.७५ कोटी रुपयांवर जाणार आहे. म्हणजेच त्यांना ८८ टक्क्यांची इन्क्रीमेंट मिळाली आहे.
-
कंपनीच्या भागधारकांकडून मंजुरीची मोहोर उमटल्यावर नवीन वेतन लागू होणार आहे.
-
या वेतनवाढीसंदर्भातील माहिती इन्फोसिसच्या आर्थिक वर्ष २०२२ च्या वार्षिक अहवालात दिली आहे.
-
मुख्याधिकारीपदावर २०१८ पासून कार्यरत सलील पारेख यांची १ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२७ अशा आणखी चार वर्षांचा कार्यकाळाला कंपनीने मंजुरी दिली आहे.
-
पारेख यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा म्हणजेच आयटी श्रेत्रातील ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे.
-
पारेख या आधी कॅपजेमिनीमध्ये कार्यकारी मंडळाचे सदस्य होते.
-
इन्फोसिसचे याआधीचे मुख्याधिकारी विशाल सिक्का यांची २०१७ आर्थिक वर्षांत ७४ कोटी रुपये वार्षिक वेतनासह नियुक्ती करण्यात आली होती.
-
त्या वेळी सिक्का यांना देण्यात आलेल्या या भरमसाट वेतनमानावरून मोठा वाद झाला होता.
-
याच कारणामुळे पारेख यांची नियुक्ती करताना इन्फोसिसने कमी वेतन निर्धारित केले होते.
-
वेतन त्याग करत कंपनीला दिलेल्या सेवांसाठी कोणतेही मानधन न घेण्याचा निर्णय नीलेकणी यांनी घेतला आहे.
-
नफ्यात असणाऱ्या इन्फोसिसने दिलेली ही भरमसाठ पगारवाढ सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.
-
अगदी सोप्या शब्दात म्हणजेच एकूण वेतन भागीले १२ असा हिशोब लावला तर पारेख यांना महिन्याला ६ कोटी ६४ लाखांहून अधिक वेतन मिळणार आहे. त्यांच्या सॅलरी ब्रेकअपनुसार त्यांना नेमकी रक्मम कशी दिली जाणार आहे पाहूयात…
-
पारेख यांची आधीच्या वेतनाची रचनेच्या तुलनेत सध्या मिळालेली वेतनवाढीचा हा तक्ताच एकूण पगारवाढ किती मोठीय याचा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा आहे. (सर्व फोटो : पीटीआय, इन्फोसिस, रॉयटर्स, सोशल मीडियावरुन साभार)
