-
पनवेल तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या मौजे वाजे गावातील येथील सलमान खानच्या ‘अर्पिता फार्म’ शेजारी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. (फोटो युट्यूबवरुन साभार)
-
स्थानिक ग्रामपंचायत आणि पोलिसांनी एकत्रित येत येथील एक धबधबाच बुजवला आहे.
-
स्थानिकांमध्ये जीवघेणा धबधबा म्हणून ओळखला जाणारा कुंडी धबधबा बुजवण्यात आलाय.
-
सदर धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागायचा. मात्र असं असूनही काही तरुण पोलिसांची नजर चुकवून सदर धबधब्यात उतरायचे.
-
मात्र या धबधक्यात पाण्याचा प्रचंड वेग व मोठ्या भवऱ्यात ते अडकून अनेकांचा बुडून मृत्यू झालाय. दरवर्षी अनेक अल्पवयीन मुले व तरुण बुडून मृत्युमुखी पडायचे.
-
त्यामुळेच या समस्येवर कायमचा प्रतिबंध व्हावा याकरिता पोलीस उपआयुक्त, परिमंडळ दोन, पनवेल शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वाजे ग्रामपंचायत कमिटीच्या उपस्थितत हा धबधबा बुजवण्यात आला.
-
कुंडी धबधब्यात ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने मोठा १० ते १५ फुटाच्या खड्ड्यात पाणी साचतं तो खड्डा पोकलेन मशिन (जमीनचा स्तर समान करण्यासाठी वापरली जाणारी जेसीबीसारखी मशीन) व नियंत्रित ब्लास्टिंगच्या साहाय्याने संपूर्ण दगडांचा भराव करून कायमचा बुजविण्यात आलाय.
-
स्थानिकांबरोबरच मुंबईच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्येही हा धबधबा प्रसिद्ध होता.
-
आता या कारवाईमुळे दरवर्षी येथे होणाऱ्या दुर्घटनांना आळा बसेल आणि अनेकांचे प्राण वाचतील असं पोलिसांकडून तसेच ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे.
-
हा धबधबा बुजवण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागणार नाही ही पोलिसांच्या दृष्टीने समाधानाची बाब असून गावकऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय.

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक