-
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवलं आहे.
-
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्ते बांधणीचा एक नवा विक्रम केलाय.
-
विशेष म्हणजे ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मधील हा विक्रम महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावतीशीसंबंधित आहे.
-
अमरावती ते अकोलादरम्यानचा ७५ किलोमीटरचा रस्ता १०७ तासांमध्ये बांधण्याचा पराक्रम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने केलाय.
-
राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील अमरावती ते अकोला मार्गावरील हा ७५ किलोमीटरचा रस्ता अवघ्या १०७ तासांत बांधण्यात आला.
-
‘बिटुमिनस काँक्रिट’ पद्धतीने ही रस्ते बांधणी केलीय.
-
एवढ्या वेगाने यापूर्वी कोणत्याच देशात अशापद्धतीची रस्ते बांधणी झालेली नाही.
-
त्यामुळेच या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय.
-
या संदर्भातील माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे.
-
या विश्वविक्रमाबद्दल गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, तंत्रज्ञ आणि कामगारांचे अभिनंदन केले.
-
३ जूनला सकाळी सात वाजता रस्ते बांधणीला सुरुवात झाली.
-
पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच १०७ तासांमध्ये म्हणजेच ७ जूनला सायंकाळी ५ वाजता हे काम पूर्ण झाले.
-
विक्रमी वेळात हा रस्ता बांधण्यासाठी ७२० हून अधिक कामगारांनी काम केलं.
-
३ जून ते ७ जूनदरम्यान रात्रंदिवस या रस्त्याचं काम सुरु होतं.
-
या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचं सांगता आपल्याला याचा फार अभिमान वाटतो, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचाही संदर्भ गडकरी यांनी यावेळेस बोलताना दिला.
-
मोदी यांनी घोषित केलेल्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवात ही कामगिरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पार पाडली याबाबत आनंदही गडकरींनी व्यक्त केला.
-
भर टाकण्यापासूनची काम या पाच दिवसांमध्ये करण्यात आली.
-
शेकडो वाहने या कामामध्ये सलग पाच दिवस कार्यरत होती.
-
अगदी रात्रीही या रस्त्याचं काम सुरु असायचं.
-
कामगार दिवसरात्र काम करत असल्याने ७२९ कामागरांना शिफ्टमध्ये नियुक्त करण्यात आलेलं.
-
प्राधिकरणाने ज्या कंत्राटदाराला हे कंत्राट दिलेलं त्याचंही नाव या प्रमाणपत्रावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वच कामगारांनी जल्लोष करत जंगी सेलिब्रेशन केलं.
-
यापूर्वी हा विक्रम कतारमधील सरकारी कंपनीच्या नावे होता. त्यांनी १० दिवसांमध्ये २५ किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण केलं होतं. सरकारने आपल्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या खात्यांवरुनही यासंदर्भातील माहिती शेअर केलीय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना