-
आपल्या दमदार भाषणांसाठी अनेकांचे आवडते असलेल्या राज यांचा आज १४ जून रोजी ५४ वा वाढदिवस आहे.
-
राज ठाकरे यांच्या राजकारणातील आयुष्या विषयी तर सगळ्यांना माहित आहे.
-
पण खूप कमी लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहित आहे. त्यात त्यांची लव्ह स्टोरी ही त्यांच्यासारखीच हटके आहे.
-
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची लव्ह स्टोरी सांगितली होती.
-
यावेळी शर्मिला त्यांची लव्ह स्टोरी सांगत म्हणाल्या, त्या रुपारेल कॉलेजमधून पास झाल्यानंतर नोकरी करत होत्या. त्यावेळी रविवारी मित्रमैत्रीणी भेटतात तसे आम्ही भेटायला गेलो होतो.
-
तेव्हा राज ठाकरे हे त्यांच्या मित्रांसोबत रुपारेलमध्येच होते. त्यावेळी शिरीष पारकर त्याच्यासोबत होते.
-
शिरीष पारकरने राज ठाकरे आणि शर्मिला यांची ओळख करुन दिली होती. शिरीष हे राज आणि शर्मिला यांचे कॉमन फ्रेण्ड होते. “तेव्हापासून राज माझ्या मागे होता,” असे शर्मिला म्हणाल्या होत्या.
-
पुढे शर्मिला म्हणाल्या, “राज कितीही सांगेल की नाही पण तोच माझ्या मागे लागला होता.”
-
त्यावेळी ते दोघं लॅण्डलाईनवर फोन करायचे आणि खूपवेळ गप्पा मारायचे.
-
तर राज साहेब आवज बदलून मुलीच्या आवाजात बोलायचे का असा प्रश्न विचारता शर्मिला म्हणाल्या की “नाही आमची वेळ बरोबर अॅडजेस्ट व्हायची.”
-
तर पुढे राज ठाकरे म्हणाले, “शर्मिला माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.”
-
त्यामुळे शर्मिला यांच्या वयामुळे पहिल्यांदा त्यांच्या लग्नाचा विचार झाला, राज ठाकरे यांच्या लग्नाचा नाही.
-
शर्मिला यांच्या बाबांनाही माहित नव्हतं की राज हे शर्मिला यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत.
-
त्यामुळे दर वाढदिवसाला आठवून कॅल्क्युलेशन करुन सगळं सतत सांगावं लागायचं.
-
पुढे शर्मिला लग्ना विषयी बोलताना म्हणाल्या, “बाबांना डाऊट होता म्हणून ते दरवर्षी विचारायचे की आता तू किती वर्षाची झालीस, तो किती वर्षाचा झाला.”
-
तर राज म्हणाले, “घरात लग्नाला विरोध झाला नाही. बाळासाहेब, माझे वडील, आणि मोहन वाघ चांगले मित्र होते.”
-
आमच्या दोघांची ओळखही नव्हती त्यावेळी बाळासाहेब जेव्हा अमेरिकेला गेले होते, तेव्हा सगळ्यात महागडी गोष्ट कोणासाठी आणली असेल तर ती शर्मिलाच्या बाबांसाठी आणली होती.
-
बाळासाहेबांनी त्यांना हॅजलब्लेड कॅमेरा आणला होता. त्यामुळे त्यांची घट्ट मैत्री होती.
-
मोहन वाघांमुळे बाळासाहेब आणि पप्पा हिला ओळखत होते.
-
पण हिची आणि माझी ओळख असल्याचा प्रश्नच नव्हता, असं राज यांनी सांगितलं.
-
शर्मिला या म्हणाल्या की, “राजची बहिण माझी मैत्रीण होती. तिला भाऊ आहे हे देखील मला माहित नव्हतं.आमचं लग्न लहान वयात झालं. अमित झाल्यानंतर त्याला हातात घेतलेल्या फोटोत राज फार लहान दिसत होता.” (All Photo Credit : Changbhal Youtube, Wikimedia, Sachin More Facebook, File Photo, Amit Thackeray)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…