-
सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या वडिलांशी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे.
-
अमोल मिटकरी यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. “माझ्या बाबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या कष्टाच्या शेतात श्री विठ्ठल मंदिर करण्याचा संकल्प आज पुर्णत्वास गेल्याचे मनस्वी समाधान वाटते,” असं म्हणत मिटकरी यांनी काही फोटो रविवारी ट्विटरवरुन शेअर केले.
-
“वारकरी सांप्रदायाच्या प्रथे परंपरेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुरवरून विशेष घडवलेल्या श्री पांडुरंगाच्या मुर्तीची स्थापना केली,” असं म्हणत मिटकरींनी पांडुरंगाच्या मुर्तीचाही फोटो पोस्ट केलाय.
-
“काही महिन्यांपुर्वी वारकरी सांप्रदायाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद वाटतो,” असंही मिटकरी म्हणालेत.
-
तसेच त्यांनी मंदिराच्या कळसाचा फोटो शेअर करतानाच, “माझ्या वडिलांची मिरासी गा देवा l तुझी चरणसेवा पांडुरंगा ll ” या अभंगाच्या ओळीही ट्विटरवर पोस्ट केल्यात.
-
अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील रामकृष्ण अप्पाजी मिटकरी यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला अध्यात्म व बालसंक्रा शिबिराचे उगमस्थान व्हावे या उद्देशाने विठ्ठल मंदिराचे निर्माण करण्यात आलंय. अमोल मिटकरी यांनी २७ मार्च २०२१ रोजी या कामाचं भूमिपूजन स्वत:च्या हस्ते केलेलं. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”