-
भाषणातून तोफा डागणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४वा वाढदिवस.
-
दुकानांवर मराठी पाट्यांची सक्ती, मशिदीवरील भोंगे, परप्रांतीयांविरुद्ध आवाज अशा भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.
-
पण त्यासोबतच राज ठाकरेंचं भाषण हादेखील अनेकदा चर्चेचा विषय असतो.
-
राज ठाकरेंच्या भाषणाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या सभेसाठी हजारो श्रोते उपस्थित असतात.
-
राज ठाकरेंचं भाषण ऐकल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण होते, असे अनेक श्रोते सांगतात.
-
त्यांच्या भाषणाची शैली, भाषेवरची पकड, स्पष्टवक्तेपणा, उत्तम वत्कृत्व यामुळे राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी लाखो नागरिक गर्दी करतात.
-
राज ठाकरेंच्या भाषणानंतरही अनेक दिवस त्याचीच चर्चा सुरु असते.
-
सोशल मीडियावरही राज ठाकरेंच्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात.
-
राज ठाकरे त्यांच्या भाषणातून विरोधक, राजकारणी यांच्यावर निशाणा साधत असतात.
-
कधी थेट वार करत तर कधी शालजोड्यातून ते विरोधकांचा समाचार घेत असतात.
-
पण उस्फुर्त आणि अभ्यासपूर्ण भाषणाची तयारी राज ठाकरे कशी करतात?, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
-
एका मुलाखतीदरम्यान राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी त्यांच्या भाषणाच्या तयारीबद्दल सांगितले होते.
-
“राज ठाकरेंचं भाषण नेहमीच उस्फुर्त असतं. ते कधीच भाषण वाचून बोलत नाहीत. अभ्यासपूर्ण भाषणासाठी ते अवांतर वाचन करतात.” असं त्या म्हणाल्या होत्या.
-
पुढे त्या म्हणाल्या, “सभेच्या दिवशी रूममध्ये त्यांची भाषणाची तयारी सुरु असते. त्यामुळे आम्ही कोणीही त्यांच्या रूममध्ये जात नाही. त्यांच्या तयारीत व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही कोणालाही रूममध्ये पाठवत नाही.”
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य