-
‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ ही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेत अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करून देखील चांगला परतावा मिळू शकतो. सध्या या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर ७.४ टक्के व्याज मिळत आहे. ६० किंवा त्याहून अधिक वयाचे लोकच या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
-
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये तुम्ही १ हजार रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते
-
या योजनेत गुंतवलेल्या पैशावर आयकराच्या कलम ८० (क) अंतर्गत सूटही मिळते.
-
या योजनेद्वारे फक्त ५ वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तर काही विशिष्ट परिस्थितीत, तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी आणखी ३ वर्षांपर्यंत वाढवू शकता. गुंतवणुकीचा कालावधी वाढवण्यासाठी तुम्हाला फॉर्म बी भरावा लागेल.
-
या योजनेमध्ये तुम्हाला लॉक इन पीरियड देखील मिळतो. समजा तुम्ही वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर या योजनेत १० लाख रुपये गुंतवले, तर बरोबर ५ वर्षांनी, तुमच्या गुंतवलेल्या पैशाचं एकूण मूल्य १४,२८,९२४ रुपये इतके होईल.
-
त्यामुळे ज्यांना जोखीममुक्त गुंतवणूक करायची आहे, त्यापैकी बहुतेकजण या योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं खातं सहजपणे उघडू शकता. (सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…