-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
पंढरीची वारी सुरू झाल्यापासून रोजचा पायी प्रवास, टाळ-मृदंगांचा अखंड नाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष अन् अभंगाच्या सुरावटीत दंग होणारे मन.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालत असलेले लाखो वारकरी ज्या एका ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे.
-
प्राजक्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारीला हजेरी लावली आहे.
-
“दोन वर्षांनंतर वारी… आनंदी आनंद…” असे कॅप्शन देत प्राजक्ताने पालखी सोहळ्यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने इरकल साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले आहे.
-
टाळ-मृदुंगाचा निनाद करीत धरलेला नादमय ताल…
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड / इन्स्टाग्राम)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?