-
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाचा आज सातवा दिवस आहे. या बंडामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.
-
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ४० आणि अपक्ष ९ आमदार असल्याचा दावा ते करत आहेत.
-
गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधील शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शानाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
शिंदेंनी पुकारलेल्या या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे.
-
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकनाथ शिंदे केंद्रबिंदू बनले आहेत.
-
त्यामुळेच शिंदे गट काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
-
रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदेंना वैयक्तिक आयुष्यातही अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले होते.
-
२००० साली आयुष्यात घडलेल्या अशाच एका प्रसंगामुळे एकनाथ शिंदेंनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता.
-
एकनाथ शिंदे कुटुंबासह गावी गेले होते. आपल्या तीन मुलांना घेऊन ते फिरायला गेले होते.
-
गावी बोटींग करत असताना त्यांच्या दिपेश ( वय ११) आणि शुभदा (वय ७) या दोन लहान मुलांचा अपघाती मृत्यू झाला. श्रीकांत शिंदेंही त्यावेळी अवघ्या १४ वर्षांचे होते.
-
२ जून २००० साली हा अपघात घडला. या प्रसंगानंतर एकनाथ शिंदे कोलमडून पडले होते. त्यांनी राजकारण सोडून केवळ कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता.
-
त्यावेळी शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांनी त्यांना सावरले. ते एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
-
“तुझ्या कुटुंबाप्रमाणे समाजालाही तुझी गरज आहे. तुझं कुटुंब इतकं छोटं नाही, मोठं कुटुंब आहे. तुला लोकांसाठी काम करायचं आहे “, असे त्यावेळी दिघे साहेबांनी मला सांगितल्याचं शिंदे मुलाखतीदरम्यान म्हणाले होते.
-
“त्यानंतर दिघे साहेबांनी मला ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी कामात व्यग्र राहिलो पाहिजे, एवढाच त्यांचा उद्देश होता “, असंही ते पुढे म्हणाले.
-
त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे या प्रसंगातून सावरले. आपलं लक्ष त्यांनी कामावर केंद्रीत केलं.
-
आता ते राज्याचे बांधकाम आणि नगरविकास मंत्री आहेत.
-
शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणतं वळण लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
-
सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम ( हेही वाचा : ठाण्यात दोन बंगले, ७० लाखांच्या गाड्या, ८० लाखांचं कर्ज…शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंची एकूण संपत्ती माहितीये?)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य