-
राज्यात सध्या सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
-
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले.
-
शिवसेनेचे ४३ आणि अपक्ष ९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. अल्पमतात आल्यामुळे अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.
-
भाजपा आणि शिंदेगट सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
-
महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी बाकावर बसलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
-
गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता मुख्यमंत्री पदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याचनिमित्ताने या पदाबद्दल आणि पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या सेवेंबद्दल जाणून घेऊया.
-
मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. मुख्यमंत्रीपद राज्यात सर्वात शक्तीशाली पद मानले जाते.
-
म्हणूनच मंत्री आणि आमदारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न असते. मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.
-
मुख्यमंत्री हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. त्यामुळे राज्याचे दैनंदिन कामकाजही मुख्यमंत्री पाहत असतात.
-
मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य लोक यांना मुख्यमंत्री नियुक्त करतात. रोजच्या कामकाजात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाची मदत होते.
-
राज्याच्या अधिकारक्षेत्रात मुख्यमंत्र्यांना मिळणारे अधिकार हे देशपातळीवर काम करणाऱ्या पंतप्रधानांसारखेच असतात. राज्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्याना असतात.
-
राज्याचा प्रमुख म्हणून कारभार पाहणाऱ्या मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला किती पगार मिळतो, याबद्दलही जाणून घेऊया.
-
देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्याला मिळणाऱ्या वेतनाचा आकडा वेगळा आहे.
-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३.४ लाख रुपये प्रतिमहिना यासोबतच आमदाराचे एका महिन्याचे वेतन पगार म्हणून मिळते.
-
याशिवाय मुख्यमंत्र्यांना प्रवास भत्ता, मोबाईल बील भत्ता असा खर्चदेखील दिला जातो.
-
पगाराव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना मोफत वैद्यकीय उपचार, प्रतिपूर्ती आणि मोफत निवासाचा लाभ, वाहन सुविधा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.
-
(सर्व फोटो : उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस/ फेसबुक)

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू