-
Maharashtra Political Crisis Updates: भाजपाने आपल्या धक्कातंत्र कायम ठेवत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी आज (३० जून) घोषणा केली.
-
राजभवनामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली.
-
आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
-
भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला.
-
घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लहान वयातच मुंबई गाठावी लागली.
-
आर्थिक अडचणींमुळे एकनाथ शिंदेंनी मासे विकणाऱ्या, दारूच्या कंपनीतही काम केले आहे.
-
एके काळी एकनाथ शिंदे ठाण्यात रिक्षाचालक होते.
-
वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासूनच त्यांनी शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली.
-
ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांचे शिंदे निकटवर्तीय होते.
-
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी व्हायचे.
-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला आहे.
-
शिंदेंच्या नावावर १८ गुन्हे दाखल आहेत.
-
परंतु, यातील एकातही त्यांची गुन्हेगारी सिद्ध झालेली नाही.
-
वयाच्या २०व्या वर्षी ते शिवसेनेचे शाखाप्रमुख बनले.
-
त्यानंतर शिंदे नगरसेवकही झाले.
-
२००१ मध्ये मात्र शिंदेंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
-
पोटच्या दोन लहान मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता.
-
शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांनी त्यांना सावरले.
-
ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपद देऊन एकनाथ शिंदेंना व्यग्र ठेवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.
-
आनंद दिघेंमुळे मोठ्या प्रसंगातून सावरल्याचं शिंदेंनी अनेकदा मुलाखतीतून सांगितले आहे.
-
त्यानंतर मात्र शिंदेंनी पुर्णपणे आपलं लक्ष कामावर केंद्रित केले.
-
२००४ मध्ये शिंदे यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली.
-
त्यानंतर सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले आहेत.
-
शिवसेनेने भाजपासोबत युती केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळाले.
-
२०१५-१९ दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
-
२०१९च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली.
-
२०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते.
-
परंतु, त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विकास या खात्यावरच समाधान मानावे लागले.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे / ट्विटर)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…