-
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
-
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत केली.
-
बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेले एकनाथ शिंदे आता राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.
-
निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ साताऱ्यातील दरे या गावी झाला.
-
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे लहान वयातच त्यांनी मुंबई गाठली.
-
ठाण्यातील मंगला हायस्कूलमधून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पुर्ण केलं.यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश हाय स्कूलमधून अकरावीचं शिक्षण घेतलं.
-
परंतु, आर्थिक अडचणींमुळे अर्धवट शिक्षण सोडून त्यांनी घरची जबाबदारी खांद्यावर घेतली.
-
शिक्षण अर्धवट राहिलेल्या शिंदेंनी वयाच्या ५६व्या वर्षी कलाशाखेतून पदवी संपादन केली.
-
सुरुवातीला मासे विकणाऱ्या, दारूच्या कंपनीतही त्यांनी नोकरी केली. त्यानंतर ते रिक्षा चालवू लागले.
-
वयाच्या १८व्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिंदेंनी शाखाप्रमुख, नगरसेवकासोबतच कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं.
-
रिक्षाचालक ते मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या प्रवासात कुटुंबाचं फार मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं.
-
एकनाथ शिंदेच्या पत्नी लता शिंदे कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.
-
एकनाथ शिंदे पत्नी लता शिंदेंसोबत.
-
पोटच्या दोन मुलांना अपघातात गमावल्यानंतर एकनाथ शिंदे आणि कुटुंबीय खचून गेलं होतं.
-
एकनाथ शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघेंनी त्यांना सावरलं. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला आधार दिला.
-
एकनाथ शिंदे आणि फॅमिलीचा खास फोटो.
-
एकनाथ शिंदेंचा एकुलता एक मुलगा श्रीकांत शिंदेदेखील राजकारणात सक्रीय आहेत.
-
श्रीकांत खासदार असून कल्याण लोकसभेचे ते प्रतिनिधित्व करतात.
-
श्रीकांत पेशाने ऑर्थोपेडीक सर्जन आहेत.
-
श्रीकांत यांनी १६ नोव्हेंबर २०१६ रोजी पत्नी वृषालीसोबत लग्नगाठ बांधली.
-
त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव ‘रुद्रांश’ असं आहे.
-
एकनाथ शिंदे आणि त्यांचा नातू.
-
(सर्व फोटो : एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे/ इन्स्टाग्राम) )

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित