-
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या अनेक नेत्यांची राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. पण यापैकी कोणत्याच नेत्यांची इच्छा अद्याप फळाला आलेली नाही.
-
मात्र शिवसेनेत बंडाचे निशाण रोवताच भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना तात्काळ मुख्यमंत्रीपद मिळाले व राज्याचे नेतृत्व करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
-
शिवसेनेमधून बाहेर पडलेले असे कोणते नेते होते ज्यांनी अशी इच्छा बाळगलेली आणि त्यानंतर त्यांचं काय झालं यावर शिंदेंच्या बंडाच्या आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्याच्या निमित्ताने टाकलेली नजर…
-
शिवसेनेत बंड केले त्या सर्वच नेत्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा होती. पण सारेच यशस्वी झाले नाही. म्हणजे थेट सांगायचं झालं तर शिंदे हे एवढ्या मोठ्या पदावर पोहचणारे पहिली नेते ठरले. (Express archive photo by Neeraj Priyadarshi)
-
शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेल्या नेत्यांकडे वळण्याआधी मागील १५ दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजाकरण ढवळून काढणाऱ्या एकनाथ शिंदें, त्यांची शिवसेनेसोबतची कामगिरी आणि बंद याबद्दल अगदी थोड्यात जाणून घेऊयात…
-
२०१४ मध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपेदी निवड झाल्यापासून एकनाथ शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढू लागली.
-
भाजपाबरोबर युती झाली आणि औट घटकेचे विरोधी पक्षनेतेपद सोडून शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले.
-
कधी ना कधी शिंदे हे राज्याचे नेतृत्व करणार हे त्यांचे समर्थक खासगीत सांगायचे.
-
२०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार या आशेवर शिंदे होते.
-
पण उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी गळ शरद पवार यांनी घातली.
-
तेव्हा हातातोंडाशी आलेला घास गेल्याचे दु:ख शिंदे यांना होते.
-
संधी मिळताच त्यांनी शिवसेनेत बंड केले. आता भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री झाले.
-
शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी शिंदे यांनाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
-
बंड करुन थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचणारे शिंदे हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत.
-
अर्थात भाजपाच्या केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे शिंदेंना सारे घडले.
-
आता शिवसेनेमधून शिंदेआधी बाहेर पडलेले पण त्यांच्याप्रमाणे थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत किंवा सत्ता मिळवण्याइतक्या यशस्वी न झालेल्या नेत्यांची कारकीर्द पाहूयात… (Photo Express archive photo)
-
नारायण राणे यांनी बंड पुकारल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
-
तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे राणे यांनी उघडपणे सांगितले होते.
-
राज्यात नेतृत्व बदल होणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा राणे करीत असत.
-
राणे हे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत असताना काँग्रेसने अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण या दोघांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली.
-
राणे हे फक्त दावाच करीत राहिले. शेवटी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
-
भाजपाने तर त्यांना थेट दिल्लीतच पाठविले.
-
राणे आणि शिवसेनेमध्ये आता टोकाचे राजकीय मतभेद आहेत. (Photo Express archive photo)
-
भुजबळ हे शिवसेनेमध्ये बंड कणारे पहिले मोठे नेते ठरले. (Express archive photo)
-
शिवसेनेचे पहिले बंड करणारे छगन भुजबळ यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा समता परिषदेच्या व्यासपीठावरून केला जात असे. (Express archive photo)
-
भुजबळ यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती. (Express archive photo)
-
भुजबळ हे १९९१ मध्ये शिवसेनेमधून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले.
-
पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भुजबळांनी पवारांसोबत नव्या पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते १९९९ मध्ये उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी कधी मिळाली नाही.
-
राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना नवी मुंबईतील शक्तिमान नेते गणेश नाईक यांचीही महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती.
-
कारण तेव्हा नाईक हे ‘मातोश्री’च्या गळ्यातील ताईत होते.
-
गणेश नाईक हे शिवसेनेला आर्थिक ताकद देत होते.
-
शिवसेनेसाठी १०० रुग्णवाहिका नाईकांनी दिल्या होत्या.
-
हात उदार सोडणाऱ्या नाईकांबद्दल शिवसेना पक्षातही चांगली भावना होती.
-
नाईक यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती त्या कालावधीमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते.
-
एक बड्या उद्योगपतीचा गणेश नाईकांवर वरदहस्त होता.
-
यामुळे गणेश नाईक हे मुख्यमंत्री होणार अशी कुजबूज त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाली.
-
काही जणांनी तर तारखांचा वायदा केला. पुढे मातोश्रीशी बिनसले. त्यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
-
गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर २० वर्ष राष्ट्रवादीमध्ये होते. २०१९ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
-
२००७ साली राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली.
-
राज ठाकरेंचं बंड हे विशेष चर्चेत आलं कारण हे घरातील बंड होतं. राज हे बाळासाहेबांचे पुतणे असल्याने या बंडाची प्रसारमाध्यमांमध्येही जोरदार चर्चा झाली.
-
राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा राज ठाकरेंनी वारंवार बोलून दाखविली.
-
राज्याच्या विकासाचा कार्यक्रम (ब्ल्यू प्रिंट) त्यांनी जाहीर केला.
-
राज्याच्या विकासासाठी आपल्याकडे नेतृत्व द्यावे, असे त्यांनी जनतेला आवाहन केले होते.
-
मनसे हा राज्यातील महत्त्वाचा आणि प्रभावी घटक असेल, असे अनेकदा सांगितले.
-
पहिल्या फटक्यात राज ठाकरे यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले.
-
एकाच वेळी आणि पहिल्या प्रयत्नात एवढे आमदार निवडून येणे हे सोपे नसते. पण राज यांनी हा चमत्कार करुन दाखवला.
-
मात्र पुढे राज ठाकरे यांना ते सातत्य पुढे राखता आले नाही.
-
सध्या मनसेचे राजू पाटील हे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार विधानसभेमध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व करतात.
-
बाळासाहेबांचा वारसा असणारे राज ठाकरे हे सुद्धा राज्याच्या सत्तेमध्ये सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले नाही. पण एकनाथ शिंदेंनी हे करुन दाखवलंय, असेच हा सारा लेखाजोखा पाहिल्यानंतर म्हणता येईल.
-
मात्र बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार बाहेर पडल्याने सरकार अल्पमतात आले आणि २९ जून रोजी उद्धव यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागाला.
-
त्यानंतर भाजपाच्या मदतीने शिंदेंनी केवळ ३९ आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळवलं. (फोटो सौजन्य: फेसबुक आणि एक्सप्रेस अर्काइव्हमधून साभार)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन