-
महाराष्ट्र विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन कालपासून (०३ जुलै) सुरू झाले आहे.
-
रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे.
-
शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे.
-
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.
-
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.
-
आदित्य यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला होता.
-
“नेहमी योग्य पावलावर चालणं खूप महत्वाचे आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे ऋणी आहे, हीच आमची खरी ताकद आहे” असे कॅप्शन या फोटोला आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
-
आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
-
अनेक बॉलिवूड कलाकारांनी या फोटोवर कमेंट केल्या आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री आहाना कुमराने या फोटोवर ५ हार्ट इमोजीची कमेंट केली आहे.
-
ठाकरे समर्थक त्यांच्या या पोस्टचे कौतुक करत शिंदे गटावर निशाणा साधत आहेत.
-
आहानाच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.
-
आहाना कुमराने ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”