-
विधिमंडळ अधिवेशनात बहुमत चाचणीला यशस्वीरित्या सामोरे गेल्यानंतर सोमवारी (४ जुलै) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह हुतात्मा स्मारकाला भेट दिली.
-
यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
-
एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले.
-
आज एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद झाला असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
भाजप-शिवसेनेचे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे.
-
या सरकारमध्ये कोणत्याही शिवसैनिकावर अन्याय होणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
-
एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक नमन केले.
-
एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या समर्थक शिवसैनिकांची त्यांनी भेट घेतली.
-
त्यावेळी एकनाथ शिंदे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.
-
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते ठाण्यात आले.
-
त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासून त्यांचे समर्थक भरपावसात टेंभीनाका येथे उपस्थित होते.
-
शिंदे यांचे आगमन होताच समर्थकांनी जल्लोष केला.
-
ढोल आणि ताशांच्या तालावर समर्थकांनी ठेका धरला.
-
शिंदे यांच्या समर्थनार्थ त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
-
परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
-
जोरात पाऊस सुरू असतानाही समर्थकांचा जल्लोष सुरू होता.
-
शिंदे यांनी सोमवारी रात्री टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
-
त्यानंतर आनंद आश्रम येथे गेले आणि तेथून बाहेर पडून त्यांनी समर्थकांची भेट घेतली.
-
शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे / ट्विटर)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”