-
Abhishek Ray and Chaitanya Sharma Gay Wedding: कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. या अनोख्या लग्नाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरू लागले आहेत. हे लग्न नवरा-नवरीच्या स्पेशल एन्ट्रीमुळे नव्हे, राजेशाही थाटात केलेल्या लग्नामुळे नव्हे, नवरीच्या एन्ट्री डान्समुळे नव्हे तर चक्क दोन गे कपलच्या लग्नामुळे ही चर्चा सुरूय.(Photo: Instagram/ kaustavsaikia)
-
कारण हा विवाहसोहळा कुणा सेलिब्रिटीचा नव्हे तर समलिंगी जोडप्याचा आहे, ज्यांनी लग्नादरम्यान कुटुंबीय आणि नातेवाईकांसमोर एकमेकांचा हात धरला होता. (Photo: Instagram/ otterbot )
-
फॅशन डिझायनर अभिषेक रे आणि डिजिटल मार्केटिंग तज्ञ चैतन्य शर्मा या दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधलीय.(Photo: Instagram/ kaustavsaikia)
-
हा विवाह सोहळा अतिशय खाजगी होता. या लग्नाला फक्त निवडक आणि खास लोकांनी हजेरी लावली होती. (Photo: Instagram/ otterbot )
-
लग्नसोहळा अतिशय भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये हळदी-मेहंदी आणि वरमाला यांसारख्या बहुतेक विवाह विधीं पार पडले होते.(Photo: Instagram/ otterbot )
-
या दोघांच्या हळदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओही इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.(Photo: Instagram/ otterbot )
-
या लग्नाला बंगाली आणि मारवाडी कुटुंबांनी हजेरी लावली होती आणि यावेळी दोन्ही समाजातील धार्मिक विधी विवाहात पार पडले. (Photo: Instagram/ otterbot )
-
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट झाले आहे की लग्नसोहळा अतिशय भव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता,.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)
-
या गे वेडिंगचे फोटो पाहिल्यानंतर फेरे घेऊन लग्नसोहळा पार पडल्याचं दिसत आहे.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)
-
यावेळी फॅशन डिझायनर अभिषेक रे यांनी पारंपारिक बंगाली नवरदेवाप्रमाणे कपडे परिधान केले होते. (Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)
-
धोती-कुर्त्यामध्ये अभिषेक रे सजून धजून दिसून येत होता. तर चैतन्यने शेरवानी घातली होती. (Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)
-
या जोडप्याच्या कलर कॉम्बिनेशनमुळे ग्लॅमरमध्ये आणखी भर पडली आहे.
-
बंगाली आणि मारवाडी दोन्ही समाजातील धार्मिक विधी विवाहात पार पडले. (Photo: Instagram/ chatterjeeshahana)
-
. लग्नसोहळ्यातील या फोटोंमध्ये दोघांची खास बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे.(Photo: Instagram/ otterbot )
-
लग्नाची तयारी मोठ्या थाटात करण्यात आली होती, ज्यामध्ये गे कपल उघड्या छतावर म्हणजेच सनरूफ असलेल्या कारमध्ये नाचताना दिसले.(Photo: Instagram/ charcoal_and_vermillionandabhishekraycreations)
-
ज्या आनंदात आणि जल्लोषात या लग्नाचे विधी पार पडले ते पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.(Photo: Instagram/ chatterjeeshahana)
-
हे फोटो पाहून काही लोकांना आश्चर्य वाटत आहे तर काहींना त्रास होत आहे. पण LGBTQ समुदायासाठी, लग्नाचे फोटो एक नवीन आशा आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्याला सामाजिक मान्यता मिळण्याची आशा आहे.(Photo: Instagram/ sreenandashankar)
-
कोलकात्यात झालेल्या एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरूय. (Photo: Instagram/ mykolkatta)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख