-
मंदिराच्या गाभाऱ्यातील देवासमोर नतमस्तक माणूसच होत नाही, तर प्राण्यांच्या ठायी देखील तोच किंबहूना त्यापेक्षाही अधिक भक्तीभाव.
-
रामदेगीच्या मंदिरात जाणाऱ्या ‘मटका’ नावाच्या वाघाने माणसापेक्षाही अधिक भक्तीभाव त्याच्या ठायी असल्याचे एकदा-दोनदा नाही तर प्रत्येकवेळी दाखवून दिले आहे.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ ही वाघीण आणि ‘मटकासूर’ या वाघाचे अपत्य म्हणजे ‘मटका’. तो ‘छोटा मटका’ या नावानेही ओळखला जातो.
-
जन्मदाते जेवढे उर्जावान तेवढाच, किंबहूना त्याहूनही अधिक तो उर्जावान.
-
आठवड्याच्या उत्तरार्धात तो हमखास रामदेगीच्या मंदिरात जातो.
-
कधी मंदिराच्या पायऱ्या चढताना तर कधी उतरताना पर्यटकांना तो हमखास दर्शन देतो, पण आजतागायत त्याने कुण्या पर्यटकावर, कुण्या भक्तांवर हल्ला केल्याचे ऐकिवात नाही. म्हणूनच तो सर्वांचा लाडका झाला आहे.
-
बरेचदा वनरक्षकांच्या कुटीजवळ तो जाऊन बसतो. त्यांच्या अवघ्या चार-पाच फुट अंतरावरुन तो फिरतो.
-
त्या वनरक्षकासोबत जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचीही अशा अविर्भावात तो वावरतो.
-
कोणतेही आढेवेढे न घेता पर्यटकांना सहज दर्शन देण्याची त्याची वृत्ती आणि हल्ली बराच शांत झालेल्या ‘मटका’ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटकांची पावले रामदेगीकडे वळतात. (सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी)

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS