-
येत्या १० जुलैला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. वारकऱ्यांच्या विठु नामाच्या गजरात अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून गेली आहे. (फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
करोनामुळे तब्बल दोन वर्षांनी यंदा वारी होत असल्यामुळे वारकरीही आनंदी आहेत. (फोटो : कृष्णा पांचाळ, प्रतिनिधी)
-
माझे माहेर पंढरी..आहे भिवरेच्या तीरी.. या अभंगा प्रमाणे दरवर्षी न चुकता वारीला भाविक येतात.(फोटो : कृष्णा पांचाळ, प्रतिनिधी)
-
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यददेखील दिंडीवारीत सहभागी झाल्या होत्या.
-
याचे फोटो त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
“जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल… महाराष्ट्रावर आलेली संकट दूर होऊन चांगले दिवस येऊ दे यासाठी भाव भक्तीने देवाकडे साकडे घातले. तहान भूक विसरून वारकऱ्यांसोबत हरिनाम जप केला”, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
-
डोईवर तुळस आणि हातात चिपळी घेऊन दिपाली वारकऱ्यांसोबत विठु नामाचा जप करताना दिसत आहेत.
-
दिपाली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
-
तसंच अनेक विषयांवर त्या आपलं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात.
-
‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ या अभंगाप्रमाणे भाविकांना ओढ आता सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची लागली आहे.
-
(सर्व फोटो : दिपाली सय्यद/ इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : यंदाच्या आषाढी पूजेचा मान एकनाथ शिंदेंना; महापूजेचे आमंत्रण घेऊन घरी आले विशेष पाहुणे) (फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती