-
राज्यात मागील काही काळात प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडल्या आणि थेट सत्तातरण होऊन महाविकासआघाडीच्या जागेवर शिंदे-फडणवीस सरकार आलं. नेमकं पडद्याआड काय घडामोडी झाल्या याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यातील काही भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात सांगत रात्रीच्या गुप्त भेटींचा उल्लेख केला. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीसांच्या वेशांतराबाबत केलेलं वक्तव्य चांगलेचं चर्चेत आहे.
-
“देवेंद्र फडणवीस सामान्यपणे खूप उशिरापर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त लक्षात आलं नाही, पण कधीकधी ते चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. ते असे दिसायचे की मलाही ओळखू यायचे नाही. मी त्यांना असं एवढ्यात नवीन काय सुरू आहे असं विचारलं. ते उत्तर देणं टाळायचे. मला तरी काही ना काही चालू आहे असं वाटायचं.” असं अमृता यांनी म्हटलं आहे.
-
मंगळवारी आणि बुधवारी देवेंद्र यांच्यासोबत नागपूर दौऱ्यावर गेलेल्या असतानाच अमृता यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केल्यापासून वेषांतर शब्दावरुन मिम्सचा पाऊस पडलाय. हेच भन्नाट मिम्स पाहूयात या गॅलरीमधून…
-
हे वेषांतर अतिसामान्य आहे सांगणारं मीम…
-
एका शब्दाची कॅप्शन आणि बराच अर्थ…
-
ओळखा पाहू असं म्हणत वेषांतर हॅशटॅगचा वापर
-
यांना आठवले जुने चित्रपट…
-
असंही एक ट्विट…
-
महाराष्ट्राचा चित्रपट झाल्याचा खोचक टोला…
-
चष्मा लावल्यावर आणि चष्मा नसताना…
-
अशीही एक व्हायरल पोस्ट
-
कोण काय तर्क लावेल सांगता येत नाही
-
हे अजून एक लॉजिक
-
विरोधकांकडूनही टीका…
-
एक चित्रपट बनवण्याची मागणी, नाव वेषांतर असं ठेवा असाही सल्ला (टीप – हे सर्व सोशल मीडियावरील फोटो असून ते केवळ एकत्रितपणे या गॅलरीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.)

New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल