-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज पुन्हा लग्नबंधनात अडकले.
-
आज म्हणजेच गुरुवारी (७ जुलै २०२२ रोजी) चंडीगडमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.
-
शीख परंपरेनुसार हे लग्न पार पडलं. भगवंत मान हे पिवळ्या रंगाची पगडी आणि गोल्डन रंगाच्या कुर्त्यामध्ये फारच छान दिसत होते.
-
तर त्यांच्या पत्नीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
-
भगवंत मान यांचं हे दुसरं लग्न आहे. डॉ गुरुप्रीत कौर यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री लग्नबंधनात अडकले.
-
कुटुंबातील जवळच्या मोजक्या लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडलं आहे.
-
अगदी साध्या पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला.
-
भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इंद्रजीत होतं. २०१६ मध्ये भगवंत मान आणि इंद्रजीत यांनी घटस्फोट घेतल्यानंतर ते दुसऱ्यांचा लग्नबंधनात अडकलेत. “मला पंजाब किंवा कुटुंब यापैकी एकाची निवड करायची होती. मी पंजाबची निवड केली.” असं घटस्फोटाबद्दल बोलताना मान यांनी पत्रकारांना सांगितलं होतं.
-
डॉक्टर गुरुप्रीत कौर देखील शिख आहेत. त्या मान कुटुंबीयांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जातं. भगवंत मान यांच्या आईसोबतचा लग्नातील हा फोटो.
-
या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख आणि मान यांचे मित्र अरविंद केजरीवालही उपस्थित होते.
-
केजरीवाल आणि मान यांनी गळाभेट घेतल्याचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
राज्यसभेचे खासदार आणि आपचे प्रवक्ते राघव चड्डा हे सुद्धा लग्नाला उपस्थित होते. त्यांनी लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
केजरीवाल यांचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
जेवण्याच्या विशेष पंगतीलही केजरीवाल हे नवदांपत्यासोबत होते. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
