-
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज सकाळी गोळीबार करण्यात आला आहे.
-
या हल्ल्यात शिंजो आबे गंभीर जखमी झाले होते, यानंतर आता त्यांचा मृत्यू झाला आहे.
-
घटनास्थळी असलेल्या एनएचकेच्या पत्रकाराने बंदुकीच्या गोळीबाराचा आवाज ऐकला असून आबे यांना रक्तस्त्राव झाल्याचं त्यानं पाहिलं.
-
जपानच्या नारा शहरात हा हल्ला झाला आहे.
-
शिंजो आबे नारा शहरात भाषण देत होते, दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आहे.
-
प्रकृती ठीक नसल्याने शिंजो आबे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
-
शिंजो आबे यांच्या कार्यकाळात भारत आणि जपान या दोन देशातील संबंध चांगल्याप्रकारे सुधारले.
-
भारत सरकारने शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्काराने सम्मानित केलं होतं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. (सर्व फोटो सौजन्य- इंडियन एक्स्प्रेस)
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?