-
राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ आणि ६ जुलै रोजी नागपूर दौऱ्यावर होते.
-
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या नागपूर मतदारसंघामध्ये मतदारांचे आभार माननण्यासाठी मंगळवारी फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले होते.
-
फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या ४० बंडखोर आमदारांबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात पोहोचले होते. यावेळेस त्यांच्या पत्नी अमृताही त्यांच्यासोबत होत्या. अमृता यांनी आता मुंबईत परतल्यावर या दौऱ्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
अमृता यांनी या दौऱ्यामधील फोटो शेअर करताना पती देवेंद्र यांचं कौतुक केलं आहे. त्या काय म्हणाल्या आहेत हे आपण या गॅलरीमधून पाहूयात…
-
फडणवीस यांचे मंगळवारी नागपूर येथे अकरा वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोच्या संख्येने जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळावरुन बाहेर येतानाच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती.
-
त्यानंतर विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
-
विमानतळावर स्वागत केल्यानंतर वर्धामार्गावरील हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी फटाकांची आतिषबाजी करण्यात आली.
-
रस्त्यादवर दुतर्फा फडणवीस यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. या मिरणुकीला मोठ्या संख्येनं नागपूरकर हजर होते. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्कूटर मिरवणूक काढली.
-
यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर,आमदार आशिष जायस्वाल, आमदार कृष्णा खोपडे आमदार विकास कुंभारे,चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते.
-
फडणवीस यांच्या आई आणि घरातील इतर महिलांनी त्यांचं औक्षण केलं.
-
उपमुख्यमंत्री बनून परतलेल्या मुलाचं स्वागत फडणवीस कुटुंबियांनी अगदी कडकडून मिठी मारत केलं.
-
मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात आपल्या कुटुंबासोबत होते. त्यांनी कुटुंबासोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
-
याच दौऱ्याबद्दल मुंबईत परतल्यावर फोटो पोस्ट करत अमृता यांनी, “नागपूरकरांचं प्रेम पाहून भारावून गेले,” असं म्हटलंय.
-
हे पुनरागमन लोकांसाठी, लोकांच्या पाठींब्याने आणि लोकांच्या भल्यासाठी आहे, असंही अमृात यांनी फोटो कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं