-
ताडोबात प्रवेश केला तर झरी प्रवेशद्वारातून समोर गेल्यावर हमखास ती दर्शन देते.
-
बांबूच्या रांजीमागे ‘कुवानी’ वाघीण आपल्या बच्च्यांसह उभी असते, पण पर्यटकांना पाहूनही न पाहल्यासारखे करत ती तिथेच अंगावर कोवळे ऊन घेत आडवी होते.
-
पहिल्यांदाच येणाऱ्या पर्यटकाला अंदाजही येणार नाही इतकी ती निसर्गाशी एकरुप होते. मध्येच तिचे बछडे तिच्या अंगाखांद्यावर खेळत असतात.
-
झरीतील ‘कुवानी’ या क्षेत्रातील एक ज्येष्ठ, धैर्यशील वाघीण म्हणून ओळखली जाते.
-
अंदाजे १५ ते १६ वर्षे वयाच्या या वाघिणीने आतापर्यंत चारवेळा बछड्यांना जन्म दिला आहे.
-
ताडोबाच्या अनेक क्षेत्रात तिचे बछडे मोठे होऊन त्यांचा अधिवास निश्चित करत आहे.
-
रानगव्याच्या शिकारीसारख्या अतिशय धाडसी शिकारीचे तिचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
-
आपले क्षेत्र तिने गेल्या १५ वर्षापासून अबाधित ठेवले आहे आणि म्हणूनच ती या क्षेत्राची साम्राज्ञी आहे.
-
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ती थकली आहे, पण तिचा दरारा अजूनही कायम आहे.
-
नवीन आलेल्या नर वाघाने ‘कुवानी’च्या दोन बछड्यांचा बळी घेतला होता आणि तिच्या दुसऱ्या दोन बछड्यांवर त्याचा आघात झाला होता.
-
म्हणूनच ती ‘कुवानी’ला सोडत नव्हती. तो मानसिक आघात तिच्याही शरीरावर दिसत आहे.
-
सर्व छायाचित्रे – मकरंद परदेशी (हेही पाहा : चर्चेतला वाघ – मंदिरात नतमस्तक होणारा वाघ कधी पाहिलाय का?)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा