-
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे चाहते ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.
-
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या वेळी या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता, त्यानंतर या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली.
-
काल १७ जुलै रोजी ‘केसरिया’ हे गाणे रिलीज झाले आणि ट्रेंडही करू लागले.
-
काही लोक या गाण्याला या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हणत असतानाच काहीजण मात्र त्याची खिल्लीही उडवत आहेत.
-
या गाण्याबद्दलचे मजेदार मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
-
‘केसरिया’ या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून ते अरिजित सिंगने गायले आहे.
-
संपूर्ण गाणे ईशा आणि शिव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये काही हिंग्लिश वाक्ये वापरली गेली आहेत.
-
याच कारणामुळे गाण्याची खिल्ली उडवली जात आहे.
-
वास्तविक, गाण्यात एक ओळ आहे, ‘काजल की स्याही से लिखी हैं तूने न जाने कितनों की लव स्टोरियां।’ आता लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवून या ओळीची खिल्ली उडवत आहेत.
-
या एका ओळीमुळे गाण्यावर मीम्सचा पूर आला आहे.
-
काहींनी जेठालालचे मीम शेअर करून ‘केसरिया’ ही ओळ चांगली असल्याचे सांगून ‘लव स्टोरियां’ची ओळ वाईट असल्याचे सांगितले आहे.
-
तर काहींनी ही ओळ बिर्याणीतील वेलचीसारखी असल्याचं सांगितलं आहे.
-
लोक म्हणतात की हे लव्ह अँथम असू शकत नाही, गाण्याचा टीझर चांगला होता, मात्र संपूर्ण गाण्याने मजा खराब झाली आहे.
-
या गाण्यासंबंधी आणखी कोणते मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत पाहूया.
-
‘केसरिया’ या गाण्यामधील ‘लव स्टोरियां’ ही ओळ म्हणजे…
-
केसरिया गाणे रिलीज होण्यापूर्वी…
-
केसरिया गाण्यातील ‘लव स्टोरियां’ची ओळ
-
ती : तो नक्कीच दुसऱ्या मुलीबद्दल विचार करत असेल…
-
सर्वात वाईट बॉलीवूड रिमेक गाण्यांच्या जगात…
-
प्रत्येक फॅमिली व्हॉटसअॅप ग्रुपमधील तो एक माणूस…
-
कधी कधी वाटतं…
-
मी ‘लव स्टोरियां।’ ही ओळ ऐकताना vs मी ‘केसरिया’ ही ओळ ऐकताना…
-
जेव्हा नैना म्हणाली होती…
-
सर्व फोटो : Instagram

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ