-
माणसांमध्ये काळा आणि गोऱ्या रंगावरून बऱ्याच चर्चा रंगतात, पण इथे एक वाघीण तिच्या गोऱ्या रंगावरून चर्चेत आली होती.
-
ही चर्चा इथवरच थांबली नाही, तर तिने पाच बछड्याना जन्म दिल्यानंतर ती आणखीच प्रसिद्ध झाली.
-
ती आहे उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याची शान वाढवणार फेअरी.
-
तिच्या गोऱ्या रंगावरून आणि रुबाबदार बाण्यावरून ‘फेअरी’ असे तिचे नाव पडले.
-
‘जय’ या जगप्रसिद्ध वाघानंतर खऱ्या अर्थाने ती उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्याची शान वाढवत आहे.
-
पाच बछड्यांसह पर्यटकांना तिचे होणारे दर्शन म्हणजे “भरून पावलो” अशीच त्यांची प्रतिक्रिया.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचा मुलगा ‘सुर्या’ हा फेअरीच्या पाच बछड्यांचा बाप.
-
२०१९ मध्ये तो उमरेड-पवनी-कऱ्हाडला अभयारण्यात आला.
-
तेव्हाच फेअरी आणि तो अनेकदा पर्यटकांना एकत्र फिरताना दिसून आले.
-
काही महिन्यात फेअरी तिच्या पाच बछड्यांसाह पर्यटकांना दर्शन देऊ लागली आणि या अभयारण्याकडे पाठ फिरवलेल्या पर्यटकांची पावले पुन्हा इकडे वळू लागली.
-
फेअरीने २०१४ मध्ये ‘बिट्टू’ आणि ‘श्रीनिवास’ या वाघांना जन्म दिला.
-
२०१७ मध्ये ‘सीता’ आणि ‘गीता’ या वाघिणीना तिने जन्म दिला.
-
२०१९ मध्ये दोन वाघ आणि दोन वाघिणीना तिने जन्म दिला आणि आता पाच बछड्याची ती आई आहे.
-
ताडोबा, पेंच, कान्हामध्ये एकाच वेळी वाघिणीने पाच बछड्याना जन्म दिला आहे, पण पहिल्यांदाच उमरेड-पवनी-कराडला अभयारण्यात फेअरीने हा इतिहास घडवलाय.
-
सर्व छायाचित्रे – आल्हाद नाईक आणि अजिंक्य भांबुरकर (हेही पाहा : आपल्या क्षेत्राची ‘सम्राज्ञी’, दरारा ठेवणारी ताडोबातील कुवानी वाघीण)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल