-
राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस.
-
या निमित्ताने त्यांच्यावर भारतातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा वॉर्ड अध्यक्ष ते उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास जाणून घेऊया…
-
१९८९ मध्ये देवेंद्र फडणवीस भाजयुमोचे वॉर्ड अध्यक्ष झाले.
-
यानंतर १९९० साली ते नागपूर शहर पश्चिमचे पदाधिकारी झाले.
-
१९९२ साली ते नागपूर शहर भाजयुमोचे अध्यक्ष झाले होते.
-
१९९२ ते २००१ असे सलग दोन टर्म नागपूर महानगरपालिकेचे सदस्य होते.
-
रामनगर विभागातून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढले होते.
-
१९९४ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आले.
-
१९९७ मध्ये फडणवीस नागपूरचे महापौर झाले.
-
नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक तरुण महापौर आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तरुण महापौर ठरले होते.
-
१९९९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.
-
तेव्हापासून देवेंद्र फडणवीस सलग आमदार आहेत.
-
२००१ साली त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी झेप घेतली.
-
२०१० भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीसपदही त्यांच्याकडे आले.
-
२०१३ मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षपद त्यांना सांभाळले.
-
विधिमंडळातील कार्य : अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरविकास, गृहनिर्माणविषयी स्थायी समिती, राखीव निधींविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समितीत फडणवीस यांनी आपले योगदान दिले आहे.
-
२०१४ साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
-
महाराष्ट्रात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीसांना मिळाला.
-
देवेंद्र फडणवीस सर्वात तरूण मुख्यमंत्री होते.
-
वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा कालावधी पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस दुसरे मुख्यमंत्री ठरले होते.
-
३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले.
-
२३ नोव्हेंबर २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
मात्र, अवघ्या तीन दिवसातच त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
-
२६ नोव्हेंबर २०१९मध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
-
यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत युती केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
-
यावेळी भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोपवले.
-
अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते.
-
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेत येईल, अशी अटकळ बांधली जात होती.
-
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर तितक्याच अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
(सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस / ट्विटर)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन