-
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज ६३वा वाढदिवस आहे.
-
राजकीय कारकिर्दीसोबतच ते अनेकदा त्यांच्या भाषणामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
-
त्यांच्या स्टाइलचा, काम करण्याच्या पद्धतीचा वेगळा असा चाहता वर्गही आहे.
-
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ते बारामती येथील आमदार आहेत. माविआ सरकारच्या काळात ते पुण्याचे पालकमंत्री होते.
-
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एकूण मालमत्तेवर एक नजर टाकूया.
-
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे एकूण ७५ कोटी ४८ लाखांची संपत्ती आहे.
-
२०१८-१९ वर्षात अजित पवार यांचे एकूण उत्पन्न ६२ कोटी ४८ लाख इतके होते.
-
तर या काळात सुनेत्रा पवार यांचे उत्पन्न तीन कोटींपेक्षा जास्त होते.
-
अजित पवार यांच्या नावे होंडा एकोर्ड, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे या तीन कार आहेत.
-
याशिवाय त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेल्या गाड्यांची एकूण किंमत सुमारे ८९ लाख रुपये इतकी आहे.
-
त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडेही इनोवा क्रिस्टा ही गाडी, एक ट्रॅक्टर आणि एक ट्रेलर आहे.
-
अजित पवार यांच्याकडे १३ लाख ९० हजारांचे, तर पत्नीकडे ६१ लाख ५६ हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत.
-
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर ५१ कोटी ७५ लाख किंमतीची जमीन आहे.
-
सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे पवार दाम्पत्याच्या मालकीची शेतजमीन आहे.
-
तर इंदापूर, लोणीकंद, जळोची, काटेवाडी येथेही त्यांच्या नावावर जमीन आणि बांधकामे आहेत.
-
याशिवाय त्यांनी शेअर आणि इतर ठिकाणी सुमारे ४९ लाखांची गुंतवणूक केली आहे.
-
अजित पवार यांनी १ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावावर २ कोटी ६८ लाखांचे कर्ज आहे.
-
एकूण संपत्तीतील सुमारे २७ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता अजित पवार यांच्या नावावर आहे.
-
तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर ४७ कोटी १६ लाखांची संपत्ती आहे.
-
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ व जय ही दोन मुले आहेत.
-
अजित पवार यांचे कुटुंबियांसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. (सर्व फोटो : अजित पवार, सुनेत्रा पवार/ फेसबुक)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन