-
Ram Nath Kovind Farewell: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
-
दिल्लीतील हॉटेल अशोका येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
-
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी देशभरातील अनेक आदिवासी नेतेही पोहोचले होते. यासोबतच अनेक पद्म पुरस्कार विजेत्यांनीही निरोप समारंभाला हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वांची भेट घेत, चर्चा केली.
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा २४ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर ते राजीनामा देतील.
-
२५ जुलै २०२२ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी पार पडणार आहे.
-
रामनाथ कोविंद यांनी २५ जुलै २०१७ रोजी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. ते भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार होते.
-
कोविंद यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या उमेदवार आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा पराभव केला होता.
-
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यापूर्वी कोविंद हे बिहारचे राज्यपाल आणि राज्यसभेचे खासदार होते.
-
कोविंद यांनी आपल्या कार्यकाळात २८ देशांचे राजकीय दौरे केले. अनेक देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला.
-
भारताचे राष्ट्रपती म्हणून पायउतार झाल्यानंतर, राम नाथ कोविंद १२, जनपथ रोड येथील शासकीय निवासस्थानात राहतील.
-
भारताचे नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी, १८ जुलै रोजी संसद आणि संबंधित राज्यांच्या विधानसभेत मतदान झालं होतं.
-
गुरुवारी २१ जुलै रोजी मतमोजणी झाली. ज्यामध्ये NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. (सर्व फोटो सौजन्य- नरेंद्र मोदी/ ट्विटर आणि इंडियन एक्स्प्रेस)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”