-
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सध्या पक्षसंघटना बळकट करण्यासाठी शिवसंवाद यात्रा करत आहेत.
-
या यात्रेदरम्यान ते शुक्रवारी, २२ जुलै रोजी नाशिकमध्ये होते.
-
नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.
-
आदित्य यांनी काळाराम मंदिरामधील मुर्तींचे फोटोही पोस्ट केले आहेत.
-
आदित्य यांनीही या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याचे काही फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत.
-
मात्र आदित्य यांच्या या भेटीनंतर दोन पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत.
-
काळाराम मंदिराला आदित्य ठाकरेंनी दिलेल्या भेटीदरम्यानचे चर्चेत असणारे हे फोटो मात्र आदित्य ठाकरेंनी पोस्ट केलेले फोटो नाहीत.
-
आदित्य ठाकरेंच्या काळाराम मंदिर भेटीदरम्यानचे फोटो महंत सुधीरदास यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेत.
-
शाल, श्रीफळ, प्रसाद आणि महावस्त्र देऊन आदित्य यांचा सत्कार करण्यात आल्याचं सुधीरदास म्हणाले आहेत.
-
“शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी साडेदहा वाजता श्री काळाराम मंदिरात महापुजा अभिषेक संकल्प करीत दर्शन घेतले,” अशा कॅप्शनसहीत सुधीरदास यांनी या भेटीदरम्यानचा व्हिडीओही पोस्ट केलाय.
-
सुधीरदास यांनी इतरही काही फोटो शेअर केले असून या फोटोंवरील काही राजकीय प्रतिक्रियांना त्यांनी उत्तरही दिलं आहे.
-
सुधीरदास यांनी ठाकरे कुटुंबातील अनेकांनी यापूर्वी या मंदिराचा भेटी दिल्याचे फोटोही पोस्ट केलेत.
-
“आपण आचार्य श्री महंत आहात मी छत्री धरतो म्हणून आपल्या हातात छत्री घेतली एवढया राजकीय दगदगीत आदित्य ठाकरेंची ही विनंम्रता भावली,” असं सुधीरदास यांनी मंदिर परिसरातील एक फोटो शेअर करत म्हटलंय. पाऊस पडत असल्याने या फोटोमध्ये आदित्य यांनी महंताच्या डोक्यावर स्वत: छत्री धरली असून दोघेही चालताना दिसत आहेत.
-
या फोटोवरुनही ट्रोलिंग झाल्याने सुधीरदास यांनी थेट सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मंदिराला भेट दिली नसल्याचं आदित्य यांच्या भेटीदरम्यानचा फोटो पोस्ट करत म्हटलंय.
-
“पाच वर्षे मुख्यमंत्री व अडीच वर्षे विरोधी पक्षनेते राहिलेले नाशिक दत्तक घेतले म्हणणारे देवेंद्र फडणवीस सात वर्षात एकदाही श्री काळाराम मंदिरात रामरायाच्या दर्शनासाठी आले नाही. किमान १०० दौरे नाशिकला झाले त्यांचे, मग काय म्हणायचं?” असा प्रश्न त्यांनी ट्वीटरवरुन विचारलाय. (सर्व फोटो ट्वीटरवरुन साभार)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती