-
‘कुवानी’चा मुलगा अशी त्याची ओळख असली तरी धिप्पाड शरीरयष्टीच्या ‘मोगली’चा २०१९ सालचा पराक्रम कुणीही विसरणार नाही.
-
अर्थातच मोजक्या पर्यटकांना तो पराक्रम डोळ्यात साठवता आला. ‘सम्राट’ हा वाघ आणि ‘मोगली’ यांच्यात जोरदार मारपीट झाली.
-
या दोघांची लढाई कुणासाठी, तर ‘मयुरी’ या वाघिणीला मिळवण्यासाठी. बराच वेळपर्यंत त्यांच्यात ही लढाई सुरू होती. मात्र, कुणीही झुकायला तयार नव्हते.
-
‘मयुरी’ हे सारे एकाच ठिकाणी स्थिर उभी राहून पाहत होती.
-
तब्बल सहा ते सात मिनिटे हा थरार पर्यटक अनुभवत होते. यात दोघांनाही जखमा झाल्या.
-
त्यानंतर ‘सम्राट’ तिथून निघून गेला आणि शेपटी हलवत ‘मयुरी’ला संकेत दिला.
-
या लढाईत ‘मोगली’चा विजय झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात नवेगाव (रामदेगी) येथे हे ऐतिहासिक युद्ध झाले.
-
‘मयुरी’ देखील ‘मोगली’सोबत निघून गेली. त्यानंतर हे दोघेही अनेकदा एकत्र पाहिले गेले.
-
‘मोगली’ हा वाघ ताडोबाच्या कोळसा वनक्षेत्रातून आला आहे.
-
सात वर्षाचा मोगली सध्या अलिझंझा, नवेगाव, रामदेगी आणि निमढेला बफर क्षेत्रात फिरत आहे.
-
अतिशय धिप्पाड आहे. तो कोळसामध्ये होता तेव्हापासूनच त्याला ‘मोगली’ या नावाने ओळखले जाते.
-
सर्व छायाचित्रे – इंद्रजित मडावी (हेही पाहा : चर्चेतला वाघ – गोरी आणि रुबाबदार ‘फेअरी’ वाघीण)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा