-
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
-
उद्धव ठाकरे हे अतिशय संयमी, मितभाषी, आणि मृदू स्वभावाचे राजकारणी आहेत.
-
राजकारणात येण्याआधी ते एक छायाचित्रकार आणि लेखक म्हणून काम करायचे.
-
२०१९च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली.
-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
-
२०१९-२२ या काळात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेवर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकूया.
-
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे १४३ कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.
-
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादक म्हणून काम पाहतात.
-
२०१८-१९ वर्षात उद्धव ठाकरेंचे वार्षिक उत्पन्न ३८ लाखांपेक्षा अधिक होते.
-
तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ८० लाखांच्या घरात होते.
-
ठाकरे दाम्पत्याने शेअर मार्केट आणि इतर ठिकाणी एकूण ५५ कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावे प्रत्येकी तीन लाखांची एलआयसी पॉलिसी आहे.
-
ठाकरे दाम्पत्याकडे सोने आणि चांदीचे मिळून दोन कोटींपेक्षाही अधिक रकमेचे दागिने आहेत.
-
तर त्या दोघांच्याही नावावर रायगड जिल्ह्यात सुमारे ११ कोटींची शेतजमीन आहे.
-
याशिवाय अहमदनगर आणि मुंबई येथेही उद्धव ठाकरेंच्या मालकीची जमीन आहे.
-
मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ बंगले आहेत.
-
या बंगल्यांची एकूण किंमत ५३ कोटींच्या घरात आहे.
-
उद्धव ठाकरेंनी चार कोटींचे तर रश्मी ठाकरेंनी आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
-
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना आदित्य आणि तेजस ही दोन मुले आहेत.
-
आदित्य ठाकरे आमदार असून राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
तेजसला राजकारणात फारसा रस नसल्याचे बोलले जात असले तरी अनेकदा निवडणूक प्रचारावेळी त्याने हजेरी लावली होती.
-
राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-
(सर्व फोटो : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे/ फेसबुक)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य