-
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटवर बुधवारी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे.
-
यावेळी ईडीच्या आधिकाऱ्यांना अर्पिता मुखर्जीच्या घरात २००० आणि ५०० रुपयांच्या नोटांचा डोंगर आढळला आहे. अर्पिता मुखर्जी या TMC आमदार आणि बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.
-
दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीत आतापर्यंत ईडीने ५०.३६ करोड रोकड आणि ५.०७ कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त केलं आहे.
-
अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ३० कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे.
-
यावेळी पाच किलो सोन्याचे दागिनेही सापडले आहे. या सोन्याची किंमत ४.३१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मालमत्तेची कागदपत्रेही ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.
-
२० कोटींची रोकड घेऊन जाण्यासाठी ट्रक मागवावा लागला.
-
काही दिवसांपूर्वी ईडीने अर्पिता मुखर्जीच्या टालीगंज येथील फ्लॅटवर छापेमारी करत २१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. म्हणजेच ईडीने अर्पिताच्या दोन घरांतून आतापर्यंत ५० कोटींहून अधिकची रोकड जप्त केली आहे.
-
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही ३ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
या छापेमारीत जवळपास पाच किलो सोन्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रत्येकी एक किलो वजनाच्या ३ विटा सापडल्या आहेत. तसेच अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या सापडल्या आहेत. याशिवाय एक सोन्याचा पेनही ईडी पथकाला सापडला आहे. (सर्व फोटो सौजन्य- एएनआय)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा