-
भाजपा खासदार अनिल फिरोजिया आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी आणि चिमुरडीमध्ये झालेला संवाद ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अनिल फिरोजिया भाजपाचे मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खासदार असून आपल्या कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीसाठी संसदेत पोहोचले होते. सोशल मीडियावर त्यांनी भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल फिरोजिया यांची मुलगी अहानाला ‘मी कोण आहे माहिती आहे का?’ असं विचारलं असता तिने उत्तर दिलं की “हो, मला माहिती आहे की तुम्ही मोदीजी आहात. तुम्ही रोज टीव्हीवर दिसता”.
-
यानंतर नरेंद्र मोदींनी तिला ‘मी काय काम करतो माहिती आहे का?’ असं विचारलं. यावर अहानाने “तुम्ही लोकसभेत नोकरी करता” असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकताच पंतप्रधान मोदींसहित उपस्थितांना हसू आवरत नव्हतं.
-
नरेंद्र मोदींनी अहानाला जाण्याआधी चॉकलेटही दिलं.
-
भाजपा खासदार अनिल फिरोजिया सोशल मीडियावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचे फोटो शेअऱ केले आहेत.
-
भाजपा खासदार अनिल फिरोजिया नितीन गडकरींनी दिलेलं आव्हान स्वीकारत वजन कमी केल्याने चर्चेत होते.
-
नितीन गडकरी यांनी अनिल फिरोजिया यांना प्रत्येकी एक किलो वजनामागे एक हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. अनिल फिरोजिया यांनी हे आव्हान पूर्ण केलं होतं.
-
“हा एक अविस्मरणीय दिवस आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नेता, देशातील सर्वात यशस्वी पंतप्रधान आणि सर्वाधिक आदऱणीय नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा मान मिळाला. त्यांचे आशीर्वाद तसंच निस्वार्थ सेवेचा मंत्र मिळाला,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने माझ्या दोन्ही मुली आनंदी असून भारावून गेल्या असल्याचंही ते म्हणाले आहेत.
-
नरेंद्र मोदींनी याआधी अनेकदा पक्षातील नेत्यांच्या लहान मुलांची भेट घेतली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात खासदार सुजय विखे पाटील यांच्या मुलीने मोदींची भेट घेतली होती. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.
-
सुजय विखे पाटील यांनी दिल्लीमध्ये सहकुटुंब जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.
-
कोविड काळात सरकारने केलेल्या विविध उपाययोजना आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल आपण यावेळी पंतप्रधानांचे आभार मानल्याचे सुजय यांनी सांगितलं होतं. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय यांची पत्नी धनश्री देखील उपस्थित होते.
-
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सुजय यांची मुलगी अनिषा हिच्यासोबतही दिलखुलासपणे संवाद साधला होता. (Photos: Twitter)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…