-
कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरुन यांच्याकडून देशातील सर्वात श्रीमंत महिलांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
-
भारतात जन्मलेल्या किंवा वाढलेल्या आणि सक्रियपणे व्यवसाय क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या १०० धनाढ्य महिलांचा या यादीत समावेश आहे.
-
रोशनी नाडर मल्होत्रा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्या ‘एचसीएल टेक्नॉलॉजीज’च्या अध्यक्षा आहेत.
-
२०२१ मध्ये त्यांच्या संपत्तीत तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ होऊन ती ८४,३३० कोटी रुपयांवर गेली आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
-
रोशनी नाडर या ४० वर्षांच्या असून मुळच्या दिल्लीच्या आहेत. त्यांनी परदेशातून व्यवसाय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
-
२००९ साली त्यांनी शिखर मल्होत्रा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना अरमान आणि जहान ही दोन मुले आहेत.
-
वन्यजीव आणि त्यांच्या संरक्षणासाठी नाडर यांनी २०१८ साली ‘हॅबिटेट ट्रस्ट’ ही संस्था सुरु केली. त्या ‘शिव नाडर फाऊंडेशन’च्या ट्रस्टी म्हणूनही काम पाहतात.
-
२०१७ ते १९ दरम्यान फोर्ब्सने जाहीर केलेल्या ‘जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला’च्या यादीत त्यांचा समावेश होता. (सर्व फोटो : रोशनी नाडर मल्होत्रा/ फेसबुक)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल